आधी दाखवण्यात येणाऱ्या देव माणूस या मालिकेत किरण गायकवाड यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारत होते. डॉ. अजीत कुमार देव या फसव्या डॉक्टरांमुळे गावातली सर्व मंडळी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना आपलं करून घेतले .परंतु या भोळ्या भाबड्या चेहऱ्यामागे एक गुन्हेगाराचा चेहरा लपला होता. ही कथा प्रेक्षक खुपच आतुरतेने पाहत होते. म्हणूनच झी मराठीने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.
देव माणूस २ चा प्रोमो रिलीज झाला आहे .पण मालिकेत काम करणार्या कलाकारांचे चेहरे अजून दाखवण्यात आले नाहीत. या सीझनमध्ये डॉक्टर अजित कुमार देव या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्याला संधी दिली आहे. असे काही लोकांचे म्हणणे आहे. पण हे साफ खोटं आहे. हे सर्व अफवा आहेत. सध्या दाखवण्यात येणाऱ्या देव माणूस २ मध्ये सुद्धा अभिनेता किरण गायकवाड हेच काम करणार आहेत. सोशल मीडियावर आणि अनेकांनी किरण हे भूमिका साकार नसल्याची बातम्या व्हायरल करून प्रेक्षकांना गोंधळात टाकले आहे. परंतु हे फक्त अफवाच आहेत. सर्वांचा लाडका किरण गायकवाड या मालिकेची कथा पुढे नेणार आहे.
देव माणूस या मालिकेत बज्याची भूमिका साकारणारा अभिनेता किरण डांगे यांचा चेहरा प्रेक्षकांना आपलं केला आहे. म्हणूनच सीजन २ मध्ये सुद्धा पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.


