Amazon

Ads Area

header ads
header ads

TRP यादीत ही मालिका अग्रेसर! आई कुठे काय करते ला या मालिकेने टाकलं मागे. पहा टॉप १० TRP यादीतील नावे.

जीवन मराठी:  सध्या मराठी वाहिनीवर अनेक वेगवेगळे नवीन मालिका आल्यामुळे त्याचप्रमाणे जुन्या मालिकांमधील नवीन कलाकारांची एन्ट्री , ट्विस्ट, नवे वळण त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता फारच वाढत आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालिकेचा टीआरपी(TRP). अनेक नवीन आलेल्या मालिकेमुळे यादीत मोठा बदल झालेला दिसत आहे. आई कुठे काय करते ही मालिका आत्तापर्यंत टीआरपी यादीत सर्वात प्रथम असत होती पण सध्या वेगळेच नाव अग्रस्थानी पाहायला मिळत आहे. चला तर मग पाहूया या आठवड्यातील टॉप १० मराठी मालिकांची यादीतील नावे.


स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' ही मालिका टी आर पी यादीत नेहमीच अग्रस्थानी पाहायला मिळत होती. पण सध्या या मालिकेला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. मालिकेची लोकप्रियता थोडी फार कमी झाल्याचे दिसत आहे. आता 'आई कुठे काय करते' ही मालिका टीआरपी यादीत दुसऱ्या स्थानावर येऊन पोहोचली आहे. तर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेने पहिल्या क्रमांकावर येऊन सर्वांना धक्का दिला आहे. अनेक वेगवेगळ्या ट्विस्ट मुळे प्रेक्षकांना ही मालिका खूपच आवडत आहे. टीआरपी यादीत तिसऱ्या क्रमांकावर 'मुलगी झाली हो 'ही मालिका दाखवली गेली आहे तर चौथ्या क्रमांकाच्या स्थानावर 'रंग माझा वेगळा' ही मालिका आहे.




 या यादीत पाचव्या क्रमांकावर फुलाला सुगंध मातीचा या मालिकेचे नाव दिसत आहे. स्टार प्रवाह वर नवीन आलेली मालिका 'टिपक्यांची रांगोळी' ही प्रेक्षकांना अवघ्याच दिवसात आपलंस केलं आहे. त्यामुळे या मालिकेच्या महाएपिसोड ने  सहाव्या स्थानावर  आपले नाव पटकावले आहे. झी मराठीवरील नुकतीच आलेली मालिका' माझी तुझी रेशीमगाठ' ही सातव्या क्रमांकावर दिसत आहे. त्याचप्रमाणे  ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने आठव्या क्रमांकाचे नाव घेतले आहे. 'बिग बॉस मराठी सीजन तिसरा' नव्या स्थानी आहे. झी मराठी ची जुनी मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला 'ही दहाव्या क्रमांकावर येऊन थांबली आहे.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads