Amazon

Ads Area

header ads
header ads

Vivo चा 'हा' जबरदस्त 5G स्मार्टफोन लॉन्च! पहा दमदार फीचर्स आणि किंमत | Vivo V23e 5G price.

जीवन मराठी: Vivo या कंपनीने काहीच दिवसात मोठे यश प्राप्त केले आहे. बजेट सह स्मार्टफोनमध्ये अनेक फिचरचे गुंतवणूक करून ग्राहकांच्या पसंतीस  पात्र ठरले आहेत. विवो ने एक त्यांचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करून बाजारात सध्या नवीन आलेल्या 5G स्मार्टफोन्स ना जोरदार टक्कर दिली आहे. विवो या कंपनीने Vivo V23e 5G हा त्यांचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Android 11 बेस वर काम करतो. चला तर मग या स्मार्टफोनच्या फीचर्स विषयी तसेच बजेट बद्दल सविस्तर जाणून घेऊया..


Vivo V23e 5G specifications :

 विवो ने या स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंच फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला आहे. त्याचप्रमाणे याचे रिझॉल्यूशन १०८०x2400 pixel एवढे आहे. हा फोन फनटच ओएस १२ या वर वर्क करतो.

या स्मार्टफोनची MediaTek Dimensity ८१० SoC सह ८ GB रॅम आहे तसेच १२८ जीबी स्टोरेज मिळते.  तुम्ही मायक्रोएसडी कार्डने स्टोरेजला १ टीबीपर्यंत वाढवू शकाल.
या स्मार्ट फोनचा बॅक पॅनल डिझाईन फारच सुंदर आणि आकर्षित आहे. यामध्ये 3 कॅमेरा दिले आहेत जे  ५० मेगापिक्सेल कॅमेरा सेटप सह ८ वाईड अँगल कॅमेरा आहे.  याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे २ मेगापिक्सेलचा तिसरा सेन्सर सुद्धा दिला आहे. या फोन मध्ये सेल्फी साठी ४४ मेगापिक्सेलचा संत कॅमेरा बसवलेला आहे. 

फिंगरप्रिंट सेंसर सह ड्युअल सिम , यूएसबी टाइप सी पोर्ट  तसेच  ड्युअल वाय-फाय सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला ४४ Watt फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४०५० mAh बॅटरी मिळते.

Vivo V23e 5G ची किंमत (price in India ) :

विवो च्या या नवीन स्मार्टफोनची किंमत सध्या जवळपास २९,२०० रुपये इतकी आहे.

हा स्मार्टफोन सन शाइन कोस्ट तसेच मून लाईट शेडो या रंगांमध्ये मिळतो.



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या