अवघ्या काहीच वर्षात हृताने आपल्या अभिनयाने सर्व तरुणांच्या हृदयावर नाव कोरून घेतले आहे. सुंदरता हा तिचा सर्वात उत्कृष्ट दागिना ठरला असून चाहते तिच्यावर जीवापाड प्रेम करताना दिसतात. तिचे हावभाव, बोलणे आणि सुंदर हास्य हे प्रेक्षकांना वेड लावणारे आहे.
हृता दुर्गुले ही सर्वात आधी 'दुर्वा' या मालिकेमधून प्रेक्षकांसमोर आली. ही मालिका सुद्धा अत्यंत लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर 'फुलपाखरू ' या मालिकेत तिने मुख्य अभिनेत्री ची भूमिका साकारून सर्व प्रेक्षकांना जवळपास वेड लावले होते. तिची नटखट अदा प्रेक्षकांना खूपच भावते. सध्या झी मराठी वरील 'मन उडू उडू झालं 'या मालिकेत सुद्धा तिने मुख्य भूमिका साकारते आहे.
पण हृता दुर्गुले सध्या एका वेगळ्याच चर्चेत आहे. इंस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे प्रेक्षकांचा चांगलाच गोंधळ उडालेला आहे. हृता हीने लोकप्रिय अभिनेता तसेच चित्रपट दिग्दर्शक प्रतिक शहा यांच्यासोबत अत्यंत गोड एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोद्वारे तिने त्यांच्या असलेल्या रिलेशनशिप बद्दल सांगत असल्याचे समजत आहे.


