२०१९ मध्ये सामनात झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे त्याला त्याचे खूप वेदना सोसावे लागले आहेत त्यानंतर त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे परंतु तंदुरुस्ती कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
हार्दिक पंड्या निवड समितीला म्हणाला की, सध्या त्याच्या शरीराच्या तंदुरुस्ती कडे लक्ष देणे अधिक गरजेचे वाटते.
राष्ट्रीय निवड समितीला संदेश देत असता त्याने आता लवकरच फिटनेस साधण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असल्याने आगामी येणाऱ्या क्रिकेट मालिकेसाठी त्याचा विचार करू नये.
हे हार्दिक से स्पष्ट वक्तव्य त्याला सध्या क्रिकेट पासून दुरावण्याचे कारण आहे.
शस्त्रक्रियेनंतर तो फारसा मजबूत नसल्याने भारत आणि मुंबई इंडियन्स संघासाठी खेळू शकला नव्हता.
सध्या हार्दिक चे लक्ष गोलंदाजी मध्ये पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचे आहे. त्यासाठी त्याने समितीकडे वेळ मागितला आहे. कारण T-20 विश्वचषक सामन्यात देखील त्याला चांगले गोलंदाजी करण्यात यश मिळाले नव्हते.
आयपीएल मध्ये सुद्धा त्याच्या फिटनेसवर अधिक लक्ष ठेवण्यात आले होते तरी सुद्धा तो एकदाही गोलंदाजी करू शकला नाही.


