Amazon

Ads Area

header ads
header ads

'Aai kuthe ky krte ?' मालिकेतील या कलाकाराने सोडली मालिका! जाणून घ्या कारण.

जीवन मराठी: स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते? मधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत. या मालिकेने नेहमीच TRP यादीत आघाडीवर क्रमांक मिळवून सर्वांनाच चकित केले आहे. मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांना अगदी जवळची वाटतात. मालिकेत होणारे नवनवीन वेस्ट तसेच अनेक धक्कादायक वळणे हे प्रेक्षकांचे उत्सुकता वाढवण्यास मदत करते. काही वेळेस ही मालिका रोल झाली तरीसुद्धा चाहत्यांनी त्यांच्या प्रेमातून पुन्हा एकदा मालिकेला तोच दर्जा मिळवून दिला.

या मालिकेबाबत एक महत्त्वाची बाबत ती समोर आली आहे. या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारा देशमुख कुटुंबांचा जावई केदार म्हणजेच आशिष कुलकर्णी हा मालिका सोडणार    असे वृत्त मिळाले आहे. मालिकेतील केदार हा चाहत्यांचा खूपच लाडका ठरला आहे. मालिकेतील भूमिका अत्यंत जबाबदारीने पार पाडणारा असा केदार मालिका सोडत असल्याने चाहत्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे.

मालिका सोडण्याचे कारण काय ?

 या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळीच जागा निर्माण केलेला केदार म्हणजेच आशिष कुलकर्णी हे आता नवीन मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
सोनी मराठी वरील तुमची मुलगी काय करते? या मालिकेमध्ये आशिष कुलकर्णी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. या नवीन मालिकेचा ट्रेलर ही  वाहिनीवर दिसत आहे.  म्हणूनच आई कुठे काय करते ही मालिका त्याने सोडली असे सांगितले जात आहे.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads