आजच गुगल डुडल( Google Doodle Today) प्रोफेसर कानो जिगोरो यांच्या 161 जन्मदिवसानिमित्ताने डुडल लावून साजरा करत आहे. तर आजचे हे गुगल डुडल लॉस एंजेलिसचे CA-बेस्ड कलाकार सिंथिया युआन चेंग यांनी बनवलं आहे. प्रोफेसर कानो जिगोरो यांना जपानचे "फादर ऑफ ज्यूदो" अशी उपाधी देण्यात आली.
Judo Meaning in Marathi
'सौम्य मार्ग' असा ज्यूदो नावाचा अर्थ होतो आणि खेळ न्याय, सौजन्य, सुरक्षा आणि नम्रता या तत्त्वांवर आधारित आहे. मार्शल आर्ट हे लोकांना एकत्र आणण्याचा एक मार्ग आहे. असं मत कानो जिगोरी यांचं होत.
Kanō Jigorō Information in Marathi
कानो जिगोरो यांचा जन्म 1860 साली मिकागे (आता कोबेचा भाग) येथे झाला. कानो हे वयाच्या 11व्या वर्षी त्यांच्या वडिलांसोबत टोकियो येथे गेले. शाळेमध्ये त्यांना लहान मूल म्हणून ओळखले जात असे तरी सुद्धा त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. यावेळी सामर्थ्य निर्माण करण्यासाठी त्यांनी जुजुत्सूच्या मार्शल आर्टचा अभ्यास करण्याचा निर्धार केला. टोकियो युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी असताना जुजुत्सू मास्टर आणि माजी सामुराई फुकुडा हाचिनोसुके त्यांना शिकवणारे मिळाले.
जुजुत्सु स्पिरिंग मॅचच्या वेळी जुदोचा शोध लागला त्यावेळी कानो यांनी एक पाश्चिमात्य कुस्ती चालीचा यात समावेश केला.जुजुत्सूमध्ये वापरलेली सर्वात धोकादायक तंत्रे काढून टाकली आणि तयार करण्यात आलेल्या खेळाला “जुडो” नाव दिले. कानोच्या Seiryoku-Zenyo (ऊर्जेचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर) आणि Jita-Kyoei (स्वतःची आणि इतरांची परस्पर समृद्धी) या वैयक्तिक तत्त्वज्ञानावर आधारित एक सुरक्षित आणि सहकारी खेळ बनवण्यात आला.
1882 साली कानो यांनी त्यांचे स्वतःचे डोजो (मार्शल आर्ट जिम) नावाचे टोकियो येथील कोडोकन ज्युडो इन्स्टिट्यूट चालू केले. येथे त्यांनी बरीच वर्षे ज्यूदो विकसित करण्यावर घालवले. तर सन 1893 मध्ये त्यांनी महिलांना या खेळात सहभागी करून घेतले.
First Asian member of the International Olympic Committee (IOC)
कानो जिगोरो 1909 साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा (IOC) पहिला आशियाई सदस्य बनले होते. त्यानंतर 1960 साली IOC ने ज्युडोला अधिकृत ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता दिली.
Kanō Jigorō यांचा जन्म दिवस आज गुगलने त्यांच्या सर्च इंजिन वर डुडल लावत साजरा करत आहे. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.


