Amazon

Ads Area

header ads
header ads

Diwali Padawa का साजरी केली जाते ? अशा प्रकारे साजरी करा Diwali 2021

भारतात अनेक सण आहेत आणि ते अगणित लोकांसमवेत खूप मोठ्या प्रमाणात साजरा केले जातात. जात ,पात ,रंग ,भेद विसरून सर्व जण एकत्र येऊन अनेक सण मांडून उत्साहात आनंदात साजरा करतात. दसरा ,गणेशोत्सव ,दिवाळी या प्रकारच्या उत्सवांमुळे एकमेकांमधील द्वेष जाऊन लोकांना एकत्र आणले जाते. एकमेकांमधील गोडी कायम टिकून देशाच्या माणुसकीच्या संपत्ती वाढ होत आहे.

या सर्व  सणांमधील प्रमुख सण म्हणून दिवाळीला ओळखले जाते. नवीन कपडे ,दाग- दागिने ,पूजा सजावटी या सर्वांचा समावेश असणाऱ्या या दिवाळीला सर्वच जण खूप मानतात.

दिवाळीत येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळी पाडवा असे म्हटले जाते. या दिवाळी पाडव्याला बलिप्रतिपदा असेही संबोधले जाते.

दिवाळी 2021 मध्ये बलिप्रतिपदा 5 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. साडेतीन मुहूर्तापैकी हा शुभ मुहूर्त म्हणून मानला जाणारा हा दिवस शुभ काम करण्यासाठी योग्य असतो. बलिप्रतिपदा हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थ आठवला जातो. 

काय आहे बलिप्रतिपदा? What is Balipratipada?

या दिवशी बळी आणि त्याची पत्नी विंद्यावली यांचे चित्र काढून भक्तिभावाने पूजा केली जाते. या दिवसापासून विक्रम संवत्सराला प्रारंभ केला जातो. जमिनीवर या दिवशी पंचरंगी रांगोळी काढून दिवे लावले जातात. पुरुष हे शिवा चे तर स्त्री दुर्गा देवीचे प्रतीक मानले असून महिला या दिवशी पतीला अभ्यंगस्नानानंतर औक्षण करतात.


काय आहे बलिप्रतिपदेचा इतिहास? What is the history of Balipratipada?

असुरांच्या राजा बळी भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा मुलगा होता. हा राजा राक्षस कुळात जन्म घेऊन सुद्धा विनयशील चारित्र्यवान आणि प्रजादक्ष राजा म्हणून याला ओळखले जायचे.

त्याच्याकडे अनेक विद्या, कला ,शक्ती यांचा साठा होता. त्याच्या जोरावर त्याने देवांना सुद्धा पराभव केले. पण बळीराजाला हरवण्यासाठी भगवान विष्णूची निवड करण्यात आली होती.

बळीराजा एकदा यज्ञ करून त्यामध्ये दान करत होते. तेवढ्यात भगवान विष्णु यांनी वामनावतार धारण करून बटूवेशात त्याच्यासमोर आले. बळीराजा हा दानशूर असल्याने वामनने त्यास तीन पावले भूमि  मागितली , बळीराजा दान करण्यास कधीच हात न आखडल्याने त्यांनी वामन अवतारातील विष्णूंना स्वर्ग आणि पृथ्वी संपादित केले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नव्हते तर बळीराजाने त्यांचे मस्तक पुढे ठेवून वामनाला त्यांच्या डोक्यावर पाऊल ठेवण्यास सांगितले. बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवत वामन आणि त्याला पाताळाचे राज्य दिले. अत्यंत दानशूर पण दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बळीराजाला भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन पाताळात गाडल्याचा हा तो दिवस.


तसेच दिवाळी पाडव्याला नवीन विवाह झालेल्या जोडप्यांची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात यालाच दिवाळी सण म्हणतात. त्यानिमित्त कृषी जावयाला आहेर मानपान करतात सोबतच पाडव्याला बळीची प्रतिमा काढून ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करतात पूजा आचार केली जाते. 

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads