Amazon

Ads Area

header ads
header ads

Samsung Galaxy M32 5G चा सेल या दिवशी; Smartphone मिळणार इतक्या Price मध्ये

स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने त्यांचा नवा स्मार्टफोन Samsung Galaxy M32 5G लॉन्च केला आहे. आता या स्मार्टफोनचा सेल कधी स्टार्ट होतो? या कडे सर्वांचं लक्ष लागून होत. मात्र आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून येत्या 2 सप्टेंबर रोजी 12 वाजता या स्मार्टफोनचा सेल ठेवण्यात आला आहे. Monster Like a Boss या tagline खाली हा स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीस येत आहे. सॅमसंग गलेक्सी एम32 हा 5जी च्या 12 बँडस ला सपोर्ट करतो. 
Samsung Galaxy M32 5G Price In marathi

सॅमसंग गलेक्सी एम 32 5 जी या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 20,999 ठेवलेली आहे. मात्र 2 सप्टेंबरच्या सेल दिवशी हा स्मार्टफोन आपल्याला 18,999 ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर अमेझॉन प्राईमचे मेम्बर असल्यास 8000 रुपयांची स्क्रिन रिप्लेस मिळणार आहे.


#befutureready या हॅशटॅग अंतर्गत आपल्याला या स्मार्टफोनला 2 वर्षं OS अपडेट्स मिळणार आहेत. या मध्ये असणारा प्रोसेसर हा Dimensity 720 Processor असणार आहे. तर सॅमसंगचा स्मार्टफोन Knox Security सहित येतो. 

Samsung Galaxy M32 5G Battery ?

या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 5000 mAh ची बॅटरी मिळणार आहे. जी आपल्याला 106 तास मुजिक प्ले टाईम देईल. तर 36 तास व्हाईस कॉलला सपोर्ट करेल. जर आपण विडिओ पाहाल तर 20 तास बॅकअप देईल. आणि इंटरनेट वापराल तर 19 तास बॅटरीबॅक देईल अस अमेझॉन वेबसाईटवर दिलेल्या मायक्रोसाईटवर सांगितलं आहे. तर हा स्मार्टफोन 15w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M32 5G Camera ?

सॅमसंग गलेक्सी एम३२ ५जी मध्ये आपल्याला रियर साईडला कॉड कॅमेरा सेटअप मिळणार आहे. त्यातील मेन लेन्स हा true 48 मेगापिक्सल असणार आहे. तर सेल्फीसाठी फ्रंटला 13 मेगापिक्सल कॅमेरा लेन्स देण्यात आला आहे. 
A-True 48MP Main
B- 8 MP Ultra Wide -123° 
C- 5 MP Macro
D- 2 MP Live Focus 
असे 4 बॅक साईडला कॅमेरे देण्यात आले आहेत.

सॅमसंग गलेक्सी एम३२ ५जी मोबाईल स्टोअरेज

Galaxy M32 5g  हा स्मार्टफोन 128 जीबी फोन स्टोअरेज सहित येतो. तर याची स्टोरेज क्षमता आपण मायक्रो एसडी कार्ड वापरून 1 टीबी पर्यंत वाढवू शकतो. 

गलेक्सी एम 32 रॅम
हा स्मार्टफोन दोन रॅम व्हेरियन्ट मध्ये असून एक 6 जीबी आहे तर दुसरा 8 जीबी व्हेरिएंट आहे.

गलेक्सी एम 32 कलर ऑप्शन
हा समार्टफोन 2 प्रीमियम कलर व्हेरिएंट मध्ये येतो ● Slate Black ● sky Blue असे 2 कलर व्हेरिएंट आहेत

या स्मार्टफोनच्या डिस्प्ले बद्दल बोलायचं तर 16.55cm म्हणजेच 6.5 इंच HD+इन्फिनिटी V डिस्प्ले देण्यात आला आहे. तर हा समार्टफोन अँड्रॉइड अकरा आधारित वन UI 3.1वर चालतो.

Samsung चे हे मोबाईल आहेत सध्या विकत घेण्यासारखे जाणून घ्या लिंक वर क्लिक करून

अश्याच महत्त्वाच्या अपडेट्स साठी फॉलो आणि सबस्क्राईब #जीवन मराठी.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या