Samsung Galaxy A12 ची भारतामधली किंमत
नवीन सॅमसंग गॅलेक्सी ए12 हा स्मार्टफोन 2 व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
4GB रॅम प्लस 64GB स्टोरेज आणि
6GB रॅम प्लस 128GB स्टोरेज असे 2 व्हेरिएंट आहेत.
तर स्मार्टफोनच्या ४ GB मॉडलची किंमत ही १३ हजार ९९९ रुपये आहे. व ६ GB मॉडलची किंमत १६ हजार ४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा समार्टफोन ब्लॅक, ब्लू, आणि व्हाइट या रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. तर या स्मार्टफोनला सॅमसंगच्या इंडियन Website वरून खरेदी करू शकता.
Samsung Galaxy A12 Specifications
६.५ इंचाचा HD+ (720x1,600 पिक्सल) TFT डिस्प्ले मिळत आहे. ऑक्टा-कोर Exynos 850 प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये मिळतो. 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असून स्टोरेज वाढविण्यासाठी मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येते. या कार्डच्या मदतीने 1 टीबीपर्यंत याची मेमरी वाढवता येवू शकते. या फोनचा OS अँड्रॉइड 11 असून One UI Core वर काम करतो. तर या स्मार्टफोनमध्ये आपल्याला साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा मिळतो आहे.


