ऑगस्ट महिन्यातच पाच मालिका बंद करून त्या जागेवर पाच नवीन मालिका सुरू करत आहेत. झी मराठीचा एकाच महिन्यात केलेला खूप मोठा प्रयोग आहेत खरंतर टीआरपी वाढवून स्टार प्रवाह चैनल ला मागे टाकण्यासाठी झी मराठीवर हा ऑगस्ट क्रांती चा प्रयोग होतोय.
यामध्ये नेमके कोणत्या मालिका बंद होणार आणि त्या जागेवर कोणत्या नवीन मालिका सुरू होणार याविषयी थोडक्यात माहिती घेऊया.
यामध्ये 16 ऑगस्टला नवीन एक 23 ऑगस्ट रोजी दोन आणि तीन ऑगस्ट रोजी आणखी दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत
यापैकी संध्याकाळी सात वाजता दिसणारी कारभारी लय भारी ही मालिका बंद होऊन त्या जागेवर मन झालं बाजिंद ही मालिका 23 ऑगस्ट पासून सुरू होईल .
त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता दिसणारी पाहिले ना मी तुला या मालिकेच्या जागेवर 'मन उडू उडू झालं' हे मालिका 30 ऑगस्ट पासून सुरू होईल.
यानंतर रात्री साडेआठ वाजता दिसणारी अगं बाई सुनबाई या मालिकेचा जागेवर 'तुझी माझी रेशीमगाठ' ही मालिका 23 ऑगस्ट पासून सुरू होईल.
त्यानंतर रात्री नऊ वाजता दिसणारी माझा होशील ना या मालिकेच्या जागेवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही नवीन मालिका 30 ऑगस्ट पासून सुरू होईल.
त्यानंतर रात्री साडेदहा वाजता दिसणारे देव माणूस या मालिकेच्या जागेवर ती परत आली आहे ही नवीन मालिका 16 ऑगस्टपासून सुरू होईल. तर अशा प्रकारे या जुने मालिकांच्या जागेवर नवीन मालिका सुरू होत आहेत
येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका सध्या सुरू राहणार असल्याची माहिती मिळते पण येत्या काही महिन्यांमध्ये ही मालिका बंद करण्याचा विचार सुरू आहेत त्याचं कारण म्हणजे झी मराठीला टीआरपी मध्ये टॉप पाच मध्ये येणाऱ्या मालिका हवे आहेत स्टार प्रवाह चैनल ला मागे टाकण्यासाठी त्यांना चांगला टीआरपी मिळवून फार गरजेचे आहेत आणि यासाठी या नवीन मालिका सुरू करत आहेत पण सध्या तरी ऑगस्ट महिन्यात या पाच मालिका बंद होऊन त्या जागेवर या पाच नवीन मालिका सुरू होत आहेत …...



