Amazon

Ads Area

header ads
header ads

ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असलेला हा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला, Price केवळ 6,399 रुपये

Itel A48 भारतात लॉन्च करण्यात आला आहे. आयटेल ही चिनी कंपनी असून हे स्मार्टफोन म्हणजे बजेट फ्रेंडली ऑफर आहे. या फोनमध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यात 3,000mAh ची बॅटरी आणि क्वाड-कोर प्रोसेसर आहे. हा फोन Android 10 (Go Edition) OS वर चालतो. 

Itel A48 ची किंमत 2GB + 32GB व्हेरिएंटसाठी 6,399 रुपये आहे. अॅमेझॉनद्वारे ग्राहक हा नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतील. मात्र सध्या हे स्मार्टफोन स्टॉकमध्ये नाहीय. कंपनीने हा फोन ग्रेडेशन ब्लॅक, ग्रेडेशन ग्रीन आणि ग्रेडेशन पर्पल कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. 


कंपनी या फोनसह ग्राहकांना वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंटची ऑफर देखील देत आहे. ग्राहक खरेदीच्या 100 दिवसांच्या आत या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. अमेझॉनचे ग्राहक या फोनवर नो-कॉस्ट EMI आणि जिओ एक्सक्लुझिव्ह बेनिफिटचा लाभ घेऊ शकतील.
Itel A48 स्मार्टफोनचे फीचर्स

Itel A48 हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 (गो एडिशन) OS वर चालतो आणि 6.1-इंच HD+ (1,560x720 पिक्सेल) आयपीएस डिस्प्ले आहे. सेल्फीसाठी डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप स्टाईल नॉच देखील आहे. या फोनमध्ये 2GB रॅमसह क्वाड-कोर 1.4GHz प्रोसेसर आहे.फोनची इंटर्नल मेमरी 32GB आहे, जी एसडी कार्डच्या मदतीने 128GB पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी  रियर साईडला दोन 5MP AI समर्थित कॅमेरे देण्यात आले आहेत.

कनेक्टिव्हिटी
कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचं तर, हे ड्युअल-सिम 4G VoLTE / ViLTE कनेक्टिव्हिटी, वाय-फाय, ब्लूटूथ, एक यूएसबी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकला सपोर्ट करते. 


विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हा बजेट फ्रेंडली फोन एक नंबर आहे.

अन्य अपडेट्ससाठी फॉलो करा @Jeevan Marathi
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या