Amazon

Ads Area

header ads
header ads

Motorola चा हा 'जबरदस्त Smartphone' १७ ऑगस्टला होणार भारतात लाँच

मागील काही दिवसांपासून Motorola Edge 20 सिरीज चर्चेत आहे. तर ही सिरीज भारतामध्ये कधी लॉन्च होणार याची बरेच जण प्रतीक्षा करत होते. आता याबाबतची माहिती समोर आली असून फ्लिपकार्ट या इ कॉमर्स वेबसाइट ने Motorola Edge 20 या स्मार्टफोन साठी एक मायक्रो वेबसाईट बनवली आहे. त्यानुसार या फोनला भारतामध्ये 17 ऑगस्ट ला 12 वाजता लॉन्च करण्यात येणार आहे. या मायक्रोसाइटवर मोटोरोला एड्ज २० च्या अनेक फीचर्सबद्दल माहिती देण्यात आली आहे.



Motorola Edge 20 चे महत्वाचे फीचर्स

Flipkart या ई कॉमर्स साइटने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये आपल्याला अनेक दमदार फीचर्स मिळणार आहेत. तर हा भारतातील सर्वात स्लीम म्हणजेच पातळ स्मार्टफोन असणार आहे. तो 5g स्मार्टफोन असून हा फोन 6.99 एम एम स्लिम / पातळ असेल. इतर फीचर्स बद्दल सांगायच तर यामध्ये मोठा डिस्प्ले असून यात १४४ हर्ट्ज HDR10+ AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले आहे, जो ५७६ हर्ट्ज टच सँपलिंग रेट देईल. भारतातील हा पहिला स्मार्टफोन असेल जो ११ ५जी बँड्ससह स्नॅपड्रॅगन ७७८G सोबत मिळेल. तर याची रॅम ८ जीबी असणार आहे, त्यामुळे आपल्याला अल्ट्रा-फास्ट परफॉर्मेंस मिळेल.

टेक्नॉलॉजी संदर्भात अन्य ताज्या बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Camera features Motorola Edge 20

यामध्ये जबरदस्त फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आलेला आहे या मधील जो प्राइमरी सेन्सर आहे तो एकशे आठ मेगापिक्सेलचा आहे जो हायर एज्युकेशन सेन्सर सहज मिळणार आहे तर दुसरा कॅमेरा आहे तो 16 मेगापिक्सल चा अल्ट्रावाइड कॅमेरा+मॅक्रो व्हिजन आहे. आणि तिसरा ८ मेगापिक्सलचा ३एक्स टेलिफोटो लेंस आहे. तर प्रोटेक्शनसाठी ThinkShield मिळणार आहे. फोन मध्ये स्टॉक अँड्रॉइड इलेव्हन देण्यात आलेला आहे.

अशाच महत्वाचे अपडेट साठी जीवन मराठी ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा पोस्ट आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

 🥏 *जीवन मराठी* चे अपडेट्स मिळवा तुमच्या व्हाट्सअँपवर तेही अगदी मोफत

http://bit.ly/Join_Jeevan_Marathi_Whatsapp_Updates

 लिंक वर क्लिक करून आपली माहिती द्या.







हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या