केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता भारतात राहात असलेले परदेशी नागरिकही CoWIN पोर्टलवर नोंदणी करू शकणार आहेत.
CoWIN हे पोर्टल कोरणा लसीकरण घेण्यासाठी आहे. तर आता परदेशी नागरिकांना यावर नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी करण्यासाठी ओळखपत्र म्हणून पासपोर्टचा वापर करता येणार आहे. आणि या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर त्यांना लसीकरणासाठी स्लॉट उपलब्ध होणार आहे.



