आपल्याला सांगू इच्छितो की हा गेम तुमच्या iPhone किंवा iPad वर मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. मात्र BGMI प्लेअर्सना रॉयल पासेससारख्या प्रोडक्टसाठी गेम इन्स्टॉल केल्यानंतर खरेदी करावी लागणार आहे. अॅप स्टोअरमध्ये गेमच्या माहितीनुसार, आयफोन प्लेअर्स सर्व भारतकेंद्रित इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतील. यासोबतच त्यांना अँड्रॉइड युजर्सना मिळत असलेली बक्षिसे देखील यात दिली जातील.
बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या iOS आवृत्तीची साईज 1.9GB आहे. क्राफ्टन कंपनीनं हा गेम अॅप स्टोअरवर 17+ श्रेणीमध्ये ठेवला आहे. म्हणजेच जर अल्पवयीन खेळाडूंना हा गेम खेळायचा असेल तर त्यांना त्यांच्या पालकांकडून किंवा पालकांशी संबंधित परवानगी घ्यावी लागेल आणि मोबाइल व्हेरिफिकेशन सिस्टीमद्वारे त्यांची संमती द्यावी लागेल.
BGMI iOS वर कसे डाउनलोड करावे (PUBG for Iphone)
तुम्ही तुमच्या iPhone च्या App Store वर जाऊन Battlegrounds Mobile India हे अँप/गेम डाउनलोड करू शकता. IOS 11.0 ऑपरेटिंग सिस्टिम असलेला किंवा त्यानंतरचा कोणताही ऑपरेटिंग सिस्टिम असलेला आयफोन, किंवा iPad OS 11.0 किंवा नंतरचा कोणताही आयपॅड या गेमला सपोर्ट करू शकेल म्हणजेच तुम्ही या मोबाईल किंवा आयपॅड वर डाउनलोड करू शकाल.
iOS 11.0 अथवा त्यानंतर चालणाऱ्या iPod Touch वर Battlegrounds Mobile India डाउनलोड करू शकाल. गेमच्या अॅप स्टोअर लिस्टिंगनुसार, गेममधील इन अॅप- पर्चेस 89 ते 8,500 रुपये एवढ्या दरम्यान आहे. यापैकी काही Appleच्या फॅमिली शेअरसाठी देखील योग्य आहेत.


