बॉलीवूड मध्ये प्रत्येक मोठा कलाकार हा संरक्षणासाठी बॉडीगार्ड ठेवत असतो आणि प्रत्येक कलाकाराची ती एक गरज आहे. या कलाकारांसोबत सावली प्रमाणे प्रत्येक ठिकाणी फिरणारे ह्या व्यक्ती काही काळाने त्यांच्या घरातील सदस्य बनतात तर हे कलाकार सुद्धा त्यांना भाऊ बहीण मानल्यासारखे, घरातले लोक असल्यासारखे मान देत असतात. तर या पोस्टमध्ये आपण अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या बॉडिगार्डबद्दल बोलणार आहोत. तीच आणि तिच्या बॉडीगार्डसोबतच अगदी जवळचं नात आहे आणि प्रत्येक रक्षाबंधनाच्या दिवशी दिपीका तिच्या बॉडीगार्ड ला राखी बांधते. सोबतच या बॉडीगार्डचा पगार इतका आहे की, एखादा आयटी कंपनीत काम करणाऱ्या व्यक्ती पेक्षाही हा पगार जास्त वाटेल.
'जलाल' अस दीपिकाच्या बॉडीगार्ड च नाव आहे आणि तो ओम शांती ओम या चित्रपटापासूनच दीपिकाचा बॉडीगार्ड आहे. सध्या दीपिका पदुकोण ही बॉलीवूड मधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे तर दीपिका जिथे जाते तेथे तिला पाहण्यासाठी तिची साइन घेण्यासाठी किंवा तिला भेटण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. तर या गर्दीपासून संरक्षणाचं काम जलाल हा करतो आणि गेली अनेक वर्ष जलाल हा आपलं काम सातत्याने पूर्ण करत आहे. त्यामुळे जलाल हा आता दीपिकाच्या घरातीलच एक सदस्य बनला आहे. दीपिका सुद्धा जलालला आपला भाऊ मानते आणि प्रत्येक रक्षाबंधनाला राखी बांधते.
इंटरनेटवर मिळालेल्या माहितीनुसार, दिपीकाचा बॉडीगार्ड असलेल्या जलाल चा पगार हा वर्षाला 80 लाखाच्या आसपास आहे तर काही वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार 2017 या वर्षी जलालचा पगार हा एक कोटी रुपये इतका वाढविण्यात आला होता. दीपिका आणि रणवीर च्या लग्नाला केवळ तीस माणसं हजर होती आणि दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाची सर्व जबाबदारी जलाल ने व्यवस्थित पार पाडली होती.
अशाच महत्त्वाचे अपडेटसाठी जीवन मराठीला फॉलो, सबस्क्राईब करा आणि हि पोस्ट शेअर करायला विसरू नका.
🥏 *जीवन मराठी* चे अपडेट्स मिळवा तुमच्या व्हाट्सअँपवर तेही अगदी मोफत
http://bit.ly/Join_Jeevan_Marathi_Whatsapp_Updates
लिंक वर क्लिक करून आपली माहिती द्या.



