टोकियो ऑलिम्पिकमधून भारतामध्ये परतलेल्या महिला आणि पुरुष हॉकी संघाचे शानदार स्वागत करण्यात आले आहे.
दिल्लीमधल्या अशोका हॉटेलमध्ये जल्लोष करण्यात आला आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन परतलेल्या भारतीय खेळाडूचा अभिनंदन सोहळा सोमवारी पार पडला.
यावेळी 'भारत माता की जय' अश्या घोषणा देण्यात आल्या.
तर या ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण मेडलसह 7 मेडल जिंकली आहेत.
भारताच्या झोळीमध्ये एकूण सात पदकं
टोकियोतल्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक जिंकून दिलं. त्यानंतर पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकलं. बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने दमदार कामगिरी करत कांस्य पदकावर नाव पटकावलं. रवी दहियाने कुस्ती मध्ये रौप्य पदक जिंकून दिलं. भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकलं. तर नीरज चोप्राने भालाफेक मध्ये सुवर्ण पदक आणि बजरंग पुनियाने कुस्तीत कांस्य पदक जिंकून दिलं.



