शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी अभ्यास करत असताना इतिहास विषयाबद्दल पंधरा प्रश्न येण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये मध्ययुगीन भारत या टॉपिक वर देखील प्रश्न येऊ शकतात.
म्हणून आम्ही आपल्यासाठी 23 प्रश्नांची उत्तरे वन लाइनर मध्ये घेऊन आलो आहोत हे आपण नक्की अभ्यासा.
ह्या आर्टिकल ची लिंक आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या परीक्षेसाठी अभ्यास करताना खूप उपयोगी येईल.
टेट परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला व्हाट्सअप द्वारे नोट्स मिळतील त्यासाठी खालील लिंक वर ग्रुप ला जॉईन व्हा.
2. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा प्रमुख चंद्रराव मोरे यांच्याकडून जावळी काबीज केली.
3. अमीर खुसरो याला भारताचा पोपट असे म्हणतात तो अल्लाउद्दीन च्या दरबारामध्ये कवी होता.
4. सिकंदर लोधी याने भूमीमापनाचे गज ए सिकंदरी प्रमाणित माप सुरू केले.
5. भारतात मुगल वंशाचा संस्थापक बाबर होता.
6. अकबराच्या शासन काळात अहमदनगरचे शासक चांदबिबी होत्या.
7. मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे नारायणराव होते.
8. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला. हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.
9. पंढरपूर हे संत चळवळीचे केंद्र होते.
10. औरंगजेब बादशाह चा मृत्यू 1707 वर्षी अहमदनगर येथे झाला.
11. शिवरायांच्या मेव्हण्याचे नाव बजाजी नाईक निंबाळकर होते.
12. इसवी सन सातव्या शतकामध्ये मोहम्मद पैगंबर यांनी इस्लामची शिकवण दिली यांचा जन्म मक्का येथे झाला होता.
13. रुपया हे नाणे सगळ्यात प्रथम शेरशाह सूरी यांनी वापरले होते.
14. शेरशाह सुरी याची समाधी सासाराम येथे आहे.
15. बाबाजीराव भोसले हे मालोजी राजे यांचे वडील होते आणि वेरूळ गावचे पाटील होते.
16. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य रयतेला सुखी करण्यासाठी हा उद्देश ठेवून केले होते.
17. कोंडाणा किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड असे नाव दिले.
18. प्रियदर्शीका, रत्नावली, नागानंद ही नाटके हर्षवर्धन यांनी लिहिली आहेत.
19. चौथाई आणि सरदेशमुखी हे मराठा साम्राज्याचे वेळचे कर होते.
20. पारसी नवीन वर्ष हा नवरोज म्हणून ओळखला जातो.
21. कोल्हापूरच्या शिलाहारांवर सिंगन द्वितीय या यादव राजाने विजय मिळवला होता.
22. शेवटचा मुघल बादशहा बहादूरशहा जफर 1862 यावर्षी रंगून येते मरण पावला.
23. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत समर्थ रामदास आणि संत तुकाराम हे होत.


