BharOS Operating System Information in Marathi:
माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये स्वदेशी मेड इन इंडिया मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम भारओएस (BharOS) ची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आलेले आहे. सदर ऑपरेटिंग सिस्टीम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास(IIT Madras)च्या इंक्युबेटेड फर्म यांच्याद्वारे तयार केलेली आहे.
या ऑपरेटिंग सिस्टिम(BharOS) चा उपयोग भारतामधील 100 कोटी मोबाईल धारक असलेल्या वापरकर्त्यांना होणार असल्याचा दावा केला जात आहे.
या ऑपरेटिंग मध्ये हायटेक सुरक्षा आणि गोपनीयता देण्यात आलेली असून या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये युजर त्यांना आवश्यक लागतील तेच ॲप्स इन्स्टॉल करतील आणि अनइंस्टॉल करू शकणार आहेत म्हणजेच इनबिल्ट इन्स्टॉल असलेले ॲप देखील अनइंस्टॉल करता येणार आहेत. म्हणजेच इतर ऑपरेटिंग सिस्टीमच्या तुलनेमध्ये यामध्ये युजर्सना अधिक स्वातंत्र्य आणि नियंत्रण देण्यात आलेल आहे.
What Is BharOS? भारओएस काय आहे?
BharOS ही एक भारतीय कार्यप्रणाली आहे जी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या स्वायत्त वैज्ञानिक सोसायटी, प्रगत संगणन विकास केंद्राने (C-DAC) विकसित केली आहे. ही एक सुरक्षित आणि हलकी ऑपरेटिंग सिस्टम आहे जी कमी-शक्तीच्या उपकरणांवर जसे की टॅब्लेट, स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवर वापरण्यासाठी अनुकूल आहे. BharOS हा Android ओपन सोर्स प्रोजेक्टवर आधारित आहे आणि भारत सरकारच्या सुरक्षा मानकांशी सुसंगत आहे.


