Oppo ही कंपनी प्रत्येक स्मार्टफोन लॉन्च करताना नवीन कॅमेरा फीचर्स देऊन ग्राहकांना नेहमीच खुश करते. नवीन मॉडेल आणि नवीन फीचर्स ही तर कंपनीची खासियत आहे. कंपनीने एक नवा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच लॉन्च केला होता. तो स्मार्टफोन ग्राहकांना कमी किमतीत खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांना हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
Flipkart ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर नवीन सेल सुरू झाला आहे . या सेलमध्ये ग्राहकांना नवीन स्मार्टफोन्स कमी किमतीत खरेदी करता येऊ शकते. हे सेल २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत आहे. या सेल मध्ये Oppo F17 pro स्मार्ट फोन वर सूट मिळवून तुम्हाला हा फोन अगदी स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो.
Oppo F17 pro specifications :
Oppo F17 Pro स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंचाचा फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. हा MediaTek Helio P95 प्रोसेसर वर काम करतो. या फोनमध्ये कॅमेरा फीचर्स पाहता बॅक पॅनेल वर 4 कॅमेरा प्रोव्हाइड केले आहे ज्यामध्ये ४८-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ -मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा सोबतच वेगळे दोन २ मेगापिक्सेलचे मोनोक्रोम सेन्सर आहेत. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेल + २ मेगापिक्सेलचा ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप प्रोव्हाइडेड आहे. अशा प्रकारे फोनमध्ये एकूण ६ कॅमेरे देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये ४,०१५ mAh बॅटरी आहे, जे ३० W VOOC फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट देतो.
Oppo F17 pro price :
Oppo चा हा स्मार्टफोन फक्त एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे ज्यामध्ये ८ GB RAM सह १२८ GB स्टोरेज मिळणार आहे. या स्मार्टफोनची खरी किंमत २५,९९० रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर ऑफर मध्ये हा फोन १६,९९० रुपयांना खरेदी करता येणार आहे. म्हणजेच ग्राहकांना स्मार्टफोनच्या किंमतीत थेट ९००० रुपयांची सूट मिळू शकते.


