सरकारला पुरेसा कोरणा लस पुरवता न आल्यामुळे मी स्वतःच्या पैशाने लस घेतली आहे. आणि यामुळे प्रमाणपत्रांवर मोदींचा फोटो घेऊन त्याचं श्रेय घेण्याचा काही अधिकार त्यांना नाहीये असं मत केरळमधील या व्यक्तीचा आहे. या व्यक्तीचं नाव पीटर म्यालीपरामबील अस असून ते माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत.
सरकारी लसीकरण केंद्रांवर कोणतेही स्लॉट उपलब्ध नसल्यामुळे मी स्वतः 750 रुपये खर्च करून खाजगी रुग्णालयात लस घेतली आहे. आणि यामुळे मोदींना माझ्या प्रमाणपत्रावर फोटो लावून क्रेडिट घेण्याचा कोणताही अधिकार नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.
सोबत अमेरिका, इस्त्राईल, कुवेत, इंडोनेशिया, फ्रांस, जर्मनी या देशाचे प्रमाणपत्र.
विशेष म्हणजे यावेळी याचिका दाखल करत असताना याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेसोबत कुवेत, अमेरिका, इजराइल, इंडोनेशिया, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांचे प्रमाणपत्र देखील सादर केले आहेत आणि तेथील पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती यांचे फोटो या प्रमाणपत्रावर नसल्याचा खातरजमा करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लसीच्या प्रमाणपत्रावर आपला फोटो लावण्याचे कोणतीही आवश्यकता नाही. इतर देशांच्या प्रमानपत्रात कोणतेही फोटो नसल्याचे स्पष्ट आहे. असाही दावा त्यांनी केला.
वाचा: Jeevan Marathi: Air India ची मालकी TATA Group कडे, पण किती रुपये मोजले.
कोरोना साठी विरुद्ध मोहिमेस पंतप्रधान मोदी यांच्या प्रसिद्धी अभियानात बदलण्यात येत असून हे अभियान वन मॅन शो असल्याचे दाखवलं जात असून देशाच्या खर्चावर एका व्यक्तीची प्रसिद्धी केली जात असून ही चिंतेची बाब आहे. अस याचिकाकर्ते पीटर यांनी म्हटलंय.
याबाबत केंद्र आणि राज्य सरकारला आपलं म्हणणं सादर करण्यासाठी केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती P.B. Suresh kumar यांनी नोटीस पाठवली आहे.
अश्याच महत्वाच्या आणि माहितीपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब - जीवन मराठी


