Amazon या ऑनलाईन Shopping Store वर शेतकऱ्यांसाठी वेगळी कॅटेगरी तयार करण्यात आली असून आता शेतकऱ्यांना ऑनलाईन शेतीला लागणारे प्रॉडक्ट्स खरेदी करता येणार आहेत.
Amazon वर Kisan साठी खास बनवण्यात आलेल्या पेजवर आपल्याला Crop Protection साठी लागणारी औषधे खरेदी करता येणार आहेत. तसेच शेतात पिकांना बळकटी आणायला लागणारे Plant Nutrition म्हणजेच खते आणि औषधे खरेदी करता येणार आहेत.
अमेझॉनच्या या साईटवर बी- बियाणे सुद्धा उपलब्ध आहेत. आणि शेतीसाठी लागणारे अवजारे सुध्दा उपलब्ध आहेत.
या साईटवर आपल्याला चांगले म्हणजेच सध्या बाजारात प्रस्थापित असलेल्या ब्रँड्सचे प्रॉडक्ट्स खरेदी करता येणार आहे. यात Bayar, Dhanuka, Fujiaka, Jain Irrigation, Syngenta, V.K. Sarvottam, MahaDhan, UPL हे ब्रँड्स असणार आहेत.
जाहिरात:
शेतावर येणाऱ्या किडीसाठी आपल्याला Insecticides, Herbicides, Fungicides, Bio- Pesticides खरेदी करता येणार आहे.
तर शेतात लागणारी HDPE Pipes, Tillers, Mulching Sheets, Knapsack Sprayers सुद्धा येथे उपलब्ध आहेत. तसेच या साईटवर आपल्याला लागणारी Drip Irrigation, Solar Lights, watering Pumps Greenhouse Shades देखील उपलब्ध असणार आहेत.
यामुळे आपल्या शहरा/गावातील दुकानात उपलब्ध नसणारे साहित्य देखील खरेदी करू शकणार आहात. सोबत काही वेळेला या प्रॉडक्ट्सवर डिस्काउंट देखील देण्यात येणार आहे. तर हे प्रॉडक्ट्स आपल्याजवळ क्रेडिट कार्ड असेल तर EMI वर देखील खरेदी करू शकू.


