Amazon

Ads Area

header ads
header ads

लाँच झाला Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन पण Price किती?

Samsung या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मात्या कँपणीने भारतामध्ये नवीन 5जी स्मार्टफोन लाँच केला असून एफ सीरिजमधील हा पहिलाच 5जी स्मार्टफोन Samsung Galaxy F42 5G आहे. या स्मार्टफोनमध्ये night मोडसह ६४ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.6 इंच फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा F42 स्मार्टफोन 12 बँड 5जी सपोर्ट करतो. तर हा स्मार्टफोनला दोन रंगात उपलब्ध करून देण्यात आला आहे. मॅट ब्लॅक आणि मॅट एक्वा हे 2 रंग ऑप्शन देण्यात आले आहेत.


Samsung Galaxy F42 5G ची Price


Samsung Galaxy F42 5G या स्मार्टफोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये असून 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये असल्याची माहिती मिळत आहे. Samsung Galaxy F42 5G या स्मार्टफोनला फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोर खरेदी करून शकता सोबत काही ठराविक रिटेल दुकानात सुद्धा हा फोन खरेदी करू शकता.

3 ऑक्टोबरपासून असणाऱ्या फ्लिपकार्टच्या Big Billion Days सेल मध्ये फोनच्या 6 GB रॅम व्हेरिएंटला 17,999 रुपये स्पेशल इंट्रोडक्टरी किंमतीत खरेदी करता येणार असल्याची माहिती फ्लिपकार्ट या इकॉमर्स वेबसाईटने दिली आहे. तर युजर्स 8 GB रॅम व्हेरिएंटला 19,999 रुपयात खरेदी करू शकणार आहेत. फ्लिपकार्ट सेलमध्ये या फोनला ३ हजार रुपये कमी मोजावे लागणार आहेत. 


या फोनमध्ये 64 MP ट्रिपल  रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत नाईट मोड सुद्धा आहे. मागील साईडला 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेंस कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनचा OS अँड्राइड ११ आधारित One UI ३.१ आहे.


Samsung Galaxy F42 5G चे Specifications

Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 inch फुल HD+ डिस्प्ले देण्यात आल असून याचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर दिला आहे. चार्जिंग साठी 15 W यूएसबी टाइप c फास्ट चार्जर सपोर्टसह ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads