आज दाखवण्यात आलेले डूडल, खर तर, एक अॅनिमेटेड फिचर आहे.तर लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे तांत्रिकदृष्ट्या, गूगलची स्थापना 4 सप्टेंबर 1998 रोजी करण्यात आली होती. या अगोदर गुगल कंपनीने आधीच्या सात वर्षांसाठी, तिथीनुसार तिची अनिव्हर्सरी साजरी केली असून, यंदा हा उत्सव 27 सप्टेंबरला साजरा करण्याचा निर्णय घेतला. गुगल या सर्च इंजिनवर सर्वात जास्त पेजस इंडेक्स करण्यात आले असून हे सध्याच्या सर्च इंजिन मध्ये टॉप वर असलेले सर्च इंजिन आहे.
तर गुगल डूडलचा इतिहास 1998 पासून सुरू होतो, म्हणजेच गुगलची स्थापना व्हायच्या अगोदर एक महिन्यापूर्वी. यातील पहिलं डुडल ब्लॅक रॉक सिटी, नेवाडा येथे दीर्घकाळ चालणाऱ्या “बर्निंग मॅन” कार्यक्रमावर होते.
गुगलच्या इतिहासाबद्दल बोलायचं तर, सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी सह-स्थापन केलेले आहे. तर गूगल आज जगात सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सुंदर पिचाई हे कार्यरत आहेत, जे 24 ऑक्टोबर 2015 रोजी या पदावर आले. पेज, दरम्यानच्या काळात, अल्फाबेट इंक मध्ये त्याच पदावर विराजमान झाले. 3 डिसेंबर 2019 रोजी, पिचाई अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले.
गूगल चे google हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. 1 वर 100 शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे. ३१ डिसेंबर २००६ रोजी गूगलमध्ये १०,६७४ लोक काम करीत होते. अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे गुगल चे मुख्यालय आहे.


