Amazon

Ads Area

header ads
header ads

बिग बॉस मराठी ३ मध्ये दादुस ने डायबेटिस असूनही पूर्ण केला भयंकर टास्क....

 छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस मराठी ओळखले जाते.वादग्रस्त असूनही हा कार्यक्रम लोक आवर्जून पाहतात. अलीकडेच बिग बॉस मराठी चे तिसरे पर्व सुरू झाले आहे. या कार्यक्रमात स्वतःचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धक जीवाचा आटापिटा करत असतो.


बिग बॉस मराठी च्या या तिसऱ्या पर्वात सर्व स्पर्धक स्वतःचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी स्पर्धक जीवाचा आटापिटा करून लढत असतात .त्याचप्रमाणे एकमेकांवर कुरघोडी करण्याची नावे ठेवण्याची एकही संधी सोडत नाही. या या कार्यक्रमात संतोष चौधरी अर्थात दादुस हे कोळी गीतांच्या क्षेत्रातील नामवंत गायक हेही सहभागी आहेत. बिग बॉस मराठी 3 च्या कार्यक्रमांत ते वयाने मोठे असलेले स्पर्धक आहेत तरीदेखील त्यांचा उत्साह इतर स्पर्धकांनी इतकाच दांडगा आहे.

या बिग बॉस मराठी च्या घरात दादुस आणि अक्षय वाघमारे यांच्या दरम्यान एक टास्क झाला .त्या टास्कमध्ये घरी आलेल्या पाहुण्याला सर्वाधिक वाईट पदार्थ तयार करून द्यायचा होते. यामध्ये अक्षयने दादुस यांना कारले, गरम मसाला, मिरची, हळद, अंडे आणि बाऊल भर मीठ घातलेला एक भयंकर असा पदार्थ तयार करून खायला दिला होता .त्यांनी देखील केलेला हा पदार्थ कोणतीही खळखळ न करता खाल्ला .जेव्हा बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांच्या डोळ्यात पाणी आले होते होते बिग बॉस मध्ये पडले आणि त्यांनी तब्येतीची काळजी घ्या असे सांगत थांबायला सांगितलं. त्यानंतर सर्व सदस्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सदस्यांचे एकमत न झाल्याने हा टास्क रद्द करण्यात आला परंतु दादुस यांनी मात्र प्रेक्षकांची मनं जिंकले.


दादूस ना आहे बीपी आणि डायबेटीस .

योगिता यांनी सांगितलं की ,'माझ्या पतीला तब्येतीच्या काही तक्रारी आहेत .त्यांना रक्तदाब आणि मधुमेह आहे त्यामुळे त्यांच्या जेवणात मिठाचा अतिशय कमी वापर असतो. ते घरी असतात तेव्हा जेवणात मिठाचा वापर करू नका असा सक्त सूचना ते आम्हाला देतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही वेगळं जेवण करतो .अशा पार्श्वभूमीवर भर मीठ असलेले पदार्थ कसा खाल्ला याची मला प्रचंड आश्चर्य वाटत आहे . जेव्हा ते पदार्थ खात होती तर मग घरातील काही सदस्य रडले होते .आमची देखील तशीच अवस्था होती .आम्ही देखील सगळेजण रडत होतो. आणि त्यांची काळजी वाटत होती परंतु ज्या पद्धतीने ते खेळले त्यांच्यासाठी अभिमानास्पद आहे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads