कोविड -१९ च्या काळात हॉटेल, मॉल ,मंदिर या सोबतच सिनेमागृहे नाट्यगृहे बंद ठेवण्यात आले होते. पण अलीकडच्या काळात राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर काही सार्वजनिक ठिकाणांना निर्बंध आसह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती पण या सगळ्यात चित्रपटगृह आणि नाट्यगृहाचा परवानगी देण्यात आली नव्हती.
मनोरंजन सृष्टीत अनेक हालचाली होऊन काही कलाकारांनी प्रश्नही उपस्थित करून आपले मत मांडले होते.
आता मनोरंजन क्षेत्रातील प्रतिनिधींच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे .22 ऑक्टोंबर पासून सर्व नाट्यगृह सुरू करण्यात यावा अशा आदेश जाहीर झाला आहे.
राज्यातील सर्व नाट्यगृहे तसेच चित्रपटगृहे 22 ऑक्टोंबर पासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल .असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले.
यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती सोपी तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच जाहीर करण्यात येईल.
आज पासून टास्क फोर्स सदस्य तसेच खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे ,अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉक्टर प्रदीप व्यास त्याचप्रमाणे निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर ,मकरंद देशपांडे ,सुबोध भावे ,आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली .इतर सार्वजनिक प्रमाणे चित्रपट गृह आणि नाट्यगृह साठी देखील खास नियमावली तयार केली गेली आहे.
या नियमावलीमध्ये मास्क लावणे, सैनीटायझर चा वापर करणे यांचा समावेश आहे.
दरम्यान 22 ऑक्टोंबर पासून सुरु होणाऱ्या चित्रपटगृहात किती टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात येईल याची अजून स्पष्टता केली नाही तरीही सुरुवातीच्या दिवसांमध्ये 50 टक्क्यांच्या मर्यादित सह चित्रपट ग्रुप व सुरू करण्यात येतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
सर्व नियमांचे माहीती करून घेऊनच प्रेक्षकांनी सिनेमागृहात प्रवेश करावा असा हट्ट या नियमाद्वारे केला आहे.


