Amazon

Ads Area

header ads
header ads

'ओ शेठ' या गाण्यावरून नवा वाद.... नेमकं झालं काय?

 गेल्या काही दिवसांपासून तरुणाईला वेड लावणार गाणं म्हणजे 'ओ शेठ' सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे .परंतु आता या गाण्यावरून एक नवा वाद सुरू झाला आहे .गायकांनी हे गाणं चोरल्याचा आरोप निर्मात्यांकडून करण्यात आला आहे.



सोशल मीडियावर काही दिवसांपासून गाजत असलेलं हो शेठ सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे .या गाण्याने तरुणाईला अक्षरशः वेड लावला आहे.प्रत्येक कार्यक्रमात समारंभात वाजणार्‍या या गाण्याने प्रत्येकालाच आपल्या तालावर नाचायला भाग पाडले. परंतु या गाण्याची चोरी झाल्याचा आरोप संगीतकारांनी केला आहे. ओ शेठ हे गाणं उमेश गवळी यांनी गायलं असून त्याचे गीतकार आणि संगीतकार प्रनिकेत खुणे आणि संध्या केशे आहेत .प्रनिकेत आणि संध्या यांनी दोघांनी मिळून या गाण्याची निर्मिती केली .परंतु गाण्याचे गीतकार आणि संगीतकार असूनही आमच्या से यूट्यूब चैनल वर उमेश आणि कॉपीराईटचा दावा केल्याने आमचं आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे .अशी तक्रार प्रनिकेत आणि संध्या यांनी केले.


संध्या आणि प्रनिकेत आपली बाजू मांडण्यासाठी सोशल मीडियावर लाईव्ह सेशन घेतले होते. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले की ,"जेव्हा हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. तेव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे गाणं आम्ही लिहिले मात्र गाणं चोरून त्याची निर्मिती करण्यात आली .आणि ते प्रदर्शित करण्यात आल. त्यावर आम्ही संबंधितांना या गोष्टीची जाणीव करून दिली .परंतु त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालं नाही .उलट आमच्या यूट्यूब चैनल वर कॉपीराइट आल्याने युट्युब कडून आमच्यावर स्ट्राइक आला आहे. त्यामुळे आमचा प्रचंड नुकसान होत आहे. फेसबुक लाईव करताना संध्या यांच्या डोळ्यातून आश्रू आले होते.

तर गाण्याचे गायक उमेश यांनी त्यांची बाजू मांडत म्हंटलं," या गाण्याचा कोणी एक व्यक्ती मालक नाही आम्ही तिघांनी मिळून गाण्याची निर्मिती केली. मी हे गाणं गाणं हे कळल्यानंतर त्यांनी मला संपर्क केला. मला या गाण्यासाठी कोणतेही मानधन मिळाले नाही. ऑडिओ त्यांच्या यूट्यूब चैनल वर आणि व्हिडिओ माझ्या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित करायचा ठरलेलं होतं. मग आता यावरून वाद निर्माण झालाय असे त्यांचे मत होते. मी हे गाणं त्यांना पाठवले याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत असे उमेश यांनी म्हटलं."

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads