टीव्हीएस मोटर हे आपल्या देशातील एक लोकप्रिय दुचाकी कंपनी म्हणून ओळखले जाते. दमदार मायलेज आणि आणि नवनवीन फीचर्स प्रोव्हाइड करून दुचाकी अधिक शानदार करण्यात पटाईत असणारे ही कंपनी येत्या 7 ऑक्टोंबर 2021 रोजी टू व्हीलर मार्केटमध्ये बाईक लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.
वैशिष्ट्ये ..
येत्या सात ऑक्टोबरला नवीन टू व्हीलर लॉन्च करणार टीव्हीएस मोटर कंपनी
काही दिवसांपूर्वी या कंपनीने 125cc असणारे बाईक TVS Raider 125 लाँच केली होती.
125 CC सेगमेंटमध्ये TVS Jupiter 125 लाँच करण्याची दाट शक्यता...
TVS motor भारतातील आघाडीची टुविलर कंपनी नवीन प्रोडक्ट आणत असते. काही दिवसांपूर्वीच कंपनी ने १२५ सीसी बाईक TVS Raider 125 लाँच केले आहे. आता कंपनी सात ऑक्टोबरला अजून एक टू व्हीलर करणार आहे. असे मीडिया रिपोर्टनुसार माहिती मिळाली आहे. कंपनी १२५ सीसी सेगमेंटमध्ये नवीन स्कूटर नवीन TVS Jupiter 125 स्कूटर असू शकते.
भारतात TVS Jupiter ही स्कूटर बरीच लोकप्रिय असून ही कंपनीचीही बेस्ट सेलिंग स्कूटर आहे. या कंपनीने ही दमदार स्कूटर नवीन लूक आणि फीचर्ससह जास्त पॉवरफुल इंजिनसोबत लाँच करेल. होंडाची प्रसिद्ध आणि भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी स्कूटर Honda Activa 125 ला ही टक्कर देईल. शिवाय Hero Maestro Edge 125 आणि Suzuki Access 125 सोबतही नवीन स्कूटरची स्पर्धा असेल.
अलीकडेच कंपनी ने एक इमेज देखील शेअर केली आहे, यामध्ये नवीन व्हेईकलचे LED DRL स्पष्ट दिसत आहेत. हे DRL स्कूटरच्या फ्रंट ऐप्रनवर दिले जातील. यामध्ये LED DRL सोबतच LED हेडलाइट आणि टेललाइट असतील, तसेच इंस्ट्रूमेंट क्लस्टरमध्येही बदल झालेला दिसेल. यासोबतच जास्त अंडर सीट स्टोरेज (सीटखाली सामान ठेवण्यासाठी जागा) मिळेल. यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिविटी ची सुविधा प्रोव्हाइड करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, अपकमिंग ज्यूपिटर 125 मध्ये एक डिजिटल स्क्रीन, एक्स्टर्नल फ्यूअल फिलर, सायलेंट स्टार्ट आणि नेविगेशन असिस्ट, टॉप स्पीड रेकॉर्डर, इन-बिल्ट लॅप-टायमर अशा सुविधांसाठी टीव्हीएस कनेक्ट मोबाइल अॅपसारखे फीचर्स दिले जातील.
स्कूटरमध्ये कंपनी NTorq 125 प्रमाणे १२४.८ सीसी सिंगल-सिलेंडर फ्यूल-इंजेक्टेड इंजिन देऊ शकते. हे इंजिन ७,००० rpm वर ९.१ bhp पॉवर आणि ५,५०० rpm वर १०.५ Nm पीक टॉर्क जनरेट करतं.
इंजिनसोबत सीवीटी गिअरबॉक्स यूनिट आहे. या सेगमेंटमध्ये आधीपासूनच NTorq 125 स्कूटर उपलब्ध आहे. तर, सध्या मार्केटमध्ये विक्री होणारी TVS Jupiter 110 सीसी सेगमेंटमध्ये येते.


