ओला इलेक्ट्रिक स्कूटर (Ola electric scooter) लाँच होण्यापूर्वी भारतीय बाजारात हाईप बनवण्यात यशस्वी झाली आहे. ओलाच्या या बाईक्सचे बुकिंग सुरू होताच 24 तासांच्या आत त्याचे 1 लाख युनिट बुक केले गेले यावरून ग्राहकांमध्ये या बाईक्स बद्दल असलेली लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो.
भाविष यांनी OLA ebike (OLA scooter price) ची सांगितली किंमत
OLAचे मुख्य कार्यकारी अधिकारी भविश अग्रवाल यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये ओला एस 1 ची किंमत 99,999 रुपये आहे. तर OLA S1 Pro ची किंमत 1,29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. याच बरोबर दिल्लीतील ग्राहकांना ओला एस 1 स्कूटरवर सरकारी सबसिडीचा लाभ मिळू शकतो. दिल्लीतील सरकारी सबसिडी मिळवल्यानंतर, OLA S1 ची किंमत 85,099 रुपये असणार आहे, आणि एस 1 प्रोची किंमत 110,149 रुपये असेल.
तर महाराष्ट्रात S1 याची किंमत 94999 रुपये असणार आहे आणि S1Pro 1,24,999 रुपये असणार आहे.
ओला एस -1 चांगली का?
आपण ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर एस -1 ची डिस्प्ले कस्टमाईज करू शकता. यात व्हाईस कंट्रोल देण्यात आले आहे. यात बिल्ट इन स्पीकरची सोय देखील उपलब्ध आहे, जेणेकरून तुम्ही कधीही, कुठेही पार्टी करू शकता. तसेच याद्वारे तुम्ही त्यातून कॉल देखील करू शकता. यामध्ये आपल्याला क्रूझ कंट्रोलचा ऑपशन मिळत आहे. जे सहसा चारचाकींमध्ये उपलब्ध असते. एस -1 चे आयकॉनिक डिझाईन सर्वांच्या पसंतीत पडत आहे, तर ही केवळ 3 सेकंदात 40 किमी प्रति तास वेग पकडू शकते. या बाईकची अव्हरेज 180 किमी आहे.
ओला च्या एस1 ई बाईकचे चार्जिंग कसे?
ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटर आता असलेल्या होम सॉकेटमधून चार्ज होण्यासाठी केवळ 6 तास लागतात. एस -1 इलेक्ट्रिक स्कूटर फास्ट चार्जरच्या सहाय्याने केवळ 18 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज करता येते. यामध्ये प्रथमच तुम्हाला कीलेस स्कूटरचा अनुभव मिळेल. स्मार्टफोनमधील अॅपच्या मदतीने S1 बाईक चावी नसली तरी चालू करता येते. रिव्हर्स मोड फीचर मध्ये, तुम्ही स्कूटरला सहजपणे रिव्हर्स घेऊ शकता.
ओला एस-1 चे फीचर्स काय आहेत? (OLA Electric Features in Marathi)
ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरला 100 ते 150 किलोमीटरची रेंज असून यात Removable लिथियम-आयन बॅटरी आहे. Ola S1 मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, क्लाउड कनेक्टिव्हिटी आणि अलॉय व्हील्स सारखे फीचर्स आहेत. चांगल्या राईडसाठी समोरील चाकाला टेलिस्कोपिक सस्पेंशन दिले जाऊ शकते. या सेगमेंटमध्ये सर्वात मोठे अंडर-सीट स्टोरेज मिळत आहे.
भारतीय मार्केटमध्ये एकूण 10 रंगांत येत आहे. रेड, ब्लू ऐंड येलो, पिंक, ग्लॉस, सिल्वर, ब्लैक, ग्रे, ब्लू अशा रंगसंगतींसह खरेदी करता येऊ शकते. हे रंग मॅट आणि ग्लॉस या दोन्ही पर्यायात उपलब्ध होणार आहेत. OLA E-Bike ची बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना प्रथम डिलिव्हरी करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या अधिकृत वेबसाइटवर ग्राहक OLA S -1 E-Bike बुक करू शकतात. यासाठी फक्त 499 रुपयांची टोकन रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम रिफंड घेता येणार आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी ग्राहकास ओला स्टोअरला भेट देण्याची गरज नाही. OLA कंपनी डोअरस्टेप डिलिव्हरी देणार आहे.
अशाच महत्वाचे अपडेट साठी जीवन मराठी ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही महत्त्वाची पोस्ट नक्की शेअर करा.


