Amazon

Ads Area

header ads
header ads

अक्षय आणि शाहिद शेजारी असलेले कोट्यवधींचे घर विकायची वेळ आली Abhishek Bachchan वर?

'द बिग बुल' या चित्रपटात अभिनय केल्यावर अनेक नेटकाऱ्यांनी अभिषेक बच्चन च कौतुक केलं. हा अभिनेता सोशल मीडियावर कायम चर्चेमध्ये असतो. काहीवेळा त्याच्या चित्रपटांमुळे तर काहीवेळा पत्नी ऐश्वर्या राय- बच्चनमुळे. 

नेटकरी बऱ्याचवेळा अभिषेक बच्चनची तुलना त्याच्या वडिलांसोबत म्हणजेच अमिताभ बच्चन यांसोबत करताना दिसतात. आता अभिषेक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिषेकने अलीकडेच मुंबईतील त्याचा एक फ्लॅट विकला आहे. अभिषेकने अचानक फ्लॅट विकल्याने त्याच्या चाहत्यांना आश्चर्य वाटलं. याचबरोबर अभिषेकने हा निर्णय का घेतला असेल याच्याबद्दल नेटकऱ्यांमध्ये सध्या कुजबुज सुरू आहे.

टाइम्स ऑफ इंडिया या वेबसाईटनुसार, अभिषेकने त्याचा हा ओबेरॉय 360 मधला 7527 स्केअर फूटाचा फ्लॅट विकला असून सदर फ्लॅट इमारतीत ३७ व्या मजल्यावर होता. 2014 या वर्षी अभिषेकने हा फ्लॅट 41 कोटी रुपयात विकत घेतला. तर आता तो 45 कोटी 75 लाख रुपये इतक्या किमतीत विकला गेला. 

या इमारतीमध्ये शाहिद कपूर आणि अक्षय कुमार यांचेसुद्धा फ्लॅट आहेत. तर अभिषेक या आतापर्यंत फ्लॅटमध्ये कधीही राहायला गेला नाही. ऐश्वर्या आणि आराध्यासोबत जलसा बंगल्यावरच अभिषेक राहतो. त्यामुळे फ्लॅट कोणत्या कारणासाठी विकला याचा खुलासा करता आला नाही. दरम्यान, याचं वर्षी मे महिन्यात अमिताभ यांनी एक घर खरेदी केले होते. अंधेरी भागात असलेले ड्युप्लेक्स अपार्टमेंट हे घर खरेदी केलं. किंमतीबद्दल बोलायचं तर  जवळपास ३१ कोटी रुपयांना हे घर खरेदी केले आहे. 

अभिषेक बच्चन हा शेवटचा 'द बिग बुल' चित्रपटात दिसला होता. तर लवकरच निमरत कौरसह 'बॉब बिस्वास' या चित्रपटात आणि चित्रांगदा सेनसह 'दसवी' या चित्रपटात झळकेल.

ही माहिती नक्की शेअर करा.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या