भारतीय लोकांच्या जीवनातील विशेष दिवस म्हणजे 15 ऑगस्ट याच दिवशी ब्रिटिश साम्राज्य पासून भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट रोजी जर वर्षी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यपासून दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तर या दिवशी दिल्लीमधील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातील विविध ठिकाणी राष्ट्र ध्वज फडकावून मानवंदना दिली जाते बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.
काय आहे भारताचा इतिहास?
इसवीसन 1770 पासून भारत देशावर इंग्रज लोकांचे राज्य होते तर एकोणिसाव्या शतकामध्ये सर्व राज्यांना इंग्रज लोकांनी सैन्यबळाच्या जोरावर ताब्यात ठेवले. अठराशे सत्तावनचा उठावानंतर ब्रिटिशांनी ही त्यांची व्यवस्था अजून कडक केली तर 1885 या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.
दुसरे महायुद्ध झाल्यानंतर ब्रिटिशांच्या लक्षात आले की,आपल्याला भारतावर असलेले राज्य आणि युद्ध दोन्ही सांभाळता येणार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतीकारांचा जोर सुद्धा वाढत होता, ही बाब कळाल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून 1947 पर्यंत भारत देश स्वतंत्र करण्याची हमी दिली तर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हा देश संपूर्ण स्वतंत्र झाला. मात्र याच वेळी भारताचे विभाजन झाले भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे पडले. पाकिस्तानी भागात असणारे अनेक पंजाबी आणि सिंधी लोकांनी त्यांचे घर, पैसा सोडून भारतात आले त्यामध्ये भरपूर लोकांना आपले प्राणही गमवावे लागले तर याच विभाजनामुळे पुढे काश्मीरचा प्रश्नही निर्माण झाला.
स्वातंत्र्य दिनाचा उत्सव कसा साजरा केला जातो?
भारतामध्ये सर्व ठिकाणी या स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असते. तर सर्व शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहण आणि ध्वजवंदन होते. भारताचे पंतप्रधान दरवर्षी लाल किल्ल्यावरून भाषण देतात आणि याचे प्रक्षेपण रेडिओ केंद्र, दूरदर्शन आणि ऑनलाईन मीडिया यांच्यावर होते. (Independence speech in marathi) तसेच देशभक्तीपर गीत लावले जातात. दूरदर्शन वर चित्रपट लागतात. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचा या दिवशी जल्लोष केला जातो.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन (75 Years of Independence)
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव हा या वर्षी म्हणजेच 2021 रोजी साजरा केला जात आहे या दिवसाचे औचित्य साधून देशभरात विविध ऐतिहासिक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत याकाळात भारताने विविध क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे भारत हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्थेमध्ये आपला ठसा उमटवत आहे.
Google कडून Doodle बनवत independence day ला मानवंदना
या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्याला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. (Happy Independence day 2021)
हा लेख नक्की शेअर करा आणि आमच्या जीवन मराठी वेब पेजला आणि यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.




