वाळवंटी वनस्पतीस पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते.
अशी रचना असल्याने त्यांच्या शरीरामधील कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर पडते.
खोड पाणी आणि अन्न साठवून ठेवल्यामुळे मांसल बनते.
खोडांना पानांच्या अभावामुळे प्रकाश संश्लेषण करावे लागत असल्याने हिरवी असतात.
पाण्याच्या शोधात मुळे जमिनीमध्ये खूप खोलवर जातात तसेच जमिनीत दूरवर पसरतात.
खोडावर मेणचट पदार्थांचा जाड थर असतो.


