Amazon

Ads Area

header ads
header ads

तब्बल 60 फूट लांबीचा पूल दिवसाढवळ्या गेला चोरीस ! The bridge was stolen from Bihar

बिहारमध्ये एक अजबच घटना घडली असून दिवसाढवळ्या तब्बल 60 फूट लांबीचा लोखंडी पूल चोरीला गेला आहे. आपल्याला विश्वास बसणार नाही मात्र आपल्या देशामधील बिहार राज्यातील ही घटना आहे. 
रोहितास ह्या बिहारमधील जिल्ह्यातील एका कालव्यावरील हा 60 फूट लांबीचा आणि वीस टन वजन असलेला लोखंडी पूल चोरट्यांनी हातोहात भरदिवसा लंपास केला आहे. त्यांचा हा चोरीचा कार्यक्रम चालू असताना लोकांना असं वाटलं की हे पाटबंधारे विभागाचे लोक असून त्यांनी हा पूल नवीन पूल झाल्यामुळे नेत आहेत. 
ही पूल चोरीची घटना नसरीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमियावर येथे झाली. 1974 या वर्षी एक लोखंडी पूल येथे बांधण्यात आला होता तर काही दिवसांपूर्वी हे चोरटे विभागीय अधिकारी असल्याचं सांगून जेसीबी, पिकअप,  गॅस कटर घेऊन आले होते. सलग तीन दिवसात त्यांनी हा पूल तोडून भरून घेऊन गेले. विशेष म्हणजे, हे चोरटे आपण पाटबंधारे विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत होते. त्यामुळे स्थानिक विभागीय कर्मचाऱ्यांनीही हा पूल नेत असताना मदत केले आणि त्यांच्या उपस्थितीतच हा पूल संपूर्णपणे लंपास केल.  हे चोर कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुलाचे भाग कापून गाडीमध्ये टाकत होते. हे काम त्यांनी सलग तीन दिवस केले मात्र हा पूल चोरीला जात आहे असा  गंध सुद्धा कुणाला आला नाही. 
हा पूल काहीसा नादुरुस्त असल्यामुळे जवळ कॉंक्रीटचा नवीन पूल बांधण्यात आला आहे त्यामुळे जुना पूल तोडून नेला जात असावा. असा समज तेथील गावकऱ्यांचा झाला आणि चोरांना यामुळे संधी मिळाली.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या