Amazon

Ads Area

header ads
header ads

T20 World Cup: रोहित शर्मा सोबत KL राहुल नाही करणार ओपनिंग! कोण आहे हा नवा प्लेअर

TWO World Cup 2021 चालू होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यावेळी टीम इंडियाकडे ही स्पर्धा जिंकण्याची नामी संधी उपलब्ध असून भारताकडे प्रत्येक Rank वर खेळण्यासाठी अनेक खेळाडू उपलब्ध आहेत. आता टीम इंडिया मधील सर्व प्लेअर चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. Rohit Sharma सोबत KL Rahul सलामी बॅटींग करण्यासाठी जाऊ शकेल मात्र कप्तान कोहली कडे एक वेगळी योजना आहे.
आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो, या विश्वचषकाच्या टीमची निवड होत असताना युवा फलंदाज ईशान किशनला कर्णधार Virat Kohli ने सांगितलं होतं की रोहित शर्मा सोबत त्याला सलामीसाठी जावं लागेल. IPL मध्ये मुंबई संघाकडून खेळणाऱ्या इशानने सांगितले आहे की, ज्या ज्या वेळी त्याला डाव सुरू करण्यासाठी विचारले जाईल त्यावेळी तो तयार असेल. यावेळी ईशान म्हणाला की, त्याला भारतीय कर्णधार कोहली कडून मिळालेली प्रेरणा क्रमवारीत वरील स्थानावर फलंदाजी करणे सोपे करत आहे. 

ओपनिंग बद्दल काय म्हणाला ईशान किशन

मी एका वेळेस फक्त एकाच मुद्यावर लक्ष केंद्रित करत होतो. मला मॅच ओपनिंग करायला आवडते.अस तो म्हणाला. यावेळी त्याने कर्णधार कोहली काय म्हणाला हेही सांगितले. 
तुझी सलामीवीर म्हणून निवड झाली असून त्यासाठी तुला तयार राहावं लागेल. 

यामध्ये आपल्याला एक बाब समजत आहे की, KL राहुल मधल्या फळीत खेळू शकतो तर रोहित ईशान किशन सोबत ओपनिंग करू शकेल. IPL च्या उर्वरित टप्यात इशानसोबत रोहित ने ओपनिंग केली असून सध्या तो चांगल्या फॉर्म मध्ये आहे.

23 वर्षीय ईशान मूळचा पाटणा, बिहार येथील असून तो लेफ्ट हँड बॅट्समन आहे. T20 मध्ये 108 match मध्ये त्याने 2693 धावा केल्या आहेत. तर त्याच सर्वात हायसकोर 113 नॉट आऊट आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या