Amazon

Ads Area

header ads
header ads

हा मोबाईल आहे कि पोकेट डायरी, काम झाल्यावर 'फोल्ड' करून ठेवा फोन | Samsung Galaxy Z Fold 3 5g

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 3 हा सॅमसंगचा सर्वात महत्वाकांक्षी स्मार्टफोनपैकी एक आहे. हा स्मार्टफोन आधीच्या स्मार्टफोन मॉडेलपेक्षा थोडा  स्लिम आहे. हा  स्मार्टफोन अनफोल्ड करता येण्याजोगा असून याच वजन 271 gram आहे. Samsung Galaxy Z Fold 3 चा बाहेरील डिस्प्ले म्हणजेच दुसरा डिस्प्ले किंवा 'कव्हर स्क्रीन' हे Samsung Galaxy Z Fold 2 ला होता असाच आहे तर हा डिस्प्ले आता 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट देतो.

Samsung Galaxy Z Fold 3 या स्मार्टफोनच मुख्य आकर्षण म्हणजे ७.६ इंच AMOLED डिस्प्ले ज्याच रिझोल्युशन 2,208x1,768 असून १२० Hz रेफ्रेश रेट आहे. 

मोबाईलचे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले ७.६० इंच (२२०८x१७६८)
प्रोसेसर ऑकटाकोर
फ्रंट कॅमेरा १० मेगापिक्सल+४ मेगापिक्सल
रियर कॅमेरा १२ मेगापिक्सल+१२ मेगापिक्सल + १२ मेगापिक्सल
RAM १२ जीबी
स्टोरेज २५६ जीबी
Battary ४४०० mAh
किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Samsung Galaxy Z Fold 3 या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC प्रोसेसर मिळतो. तर हा Galaxy Z Fold 3 स्मार्टफोन Samsung's S Pen ‘Fold Edition' आणि नव्या S Pen Pro ला सपोर्ट करतो. मुख्य म्हणजे हा फोन water resistance असून IPX8 rated आहे. Samsung's चे स्वतःचे apps या फोनला मल्टी विंडो उघडण्यासाठी ओप्टीमाइज करण्यात आले असून samsung इतर कंपन्यासोबत देखील कोल्याब्रेशन करत आहे. यामध्ये स्पोटीफाय या सारख्या कंपन्या समाविष्ट आहेत. यामुळे Galaxy Z Fold 3 5g वापरत असताना नवा आणि चांगला अनुभव प्राप्त होईल. 

वाचा: अरे वा! घडी घालता येण्याजोगा स्मार्टफोन Samsung Galaxy Z Flip 3 5G

Samsung Galaxy Z Fold 3 हा स्मार्टफोन ११ ऑगष्ट २०२१ ला लौन्च करण्यात आला आहे. यांची Battery capacity 4400mAh असून हा मोबाईल fast चार्जिंगला सपोर्ट करतो. Phantom Black, Phantom Green, Phantom Silver या तीन कलर व्हेरीयंट मध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

Samsung Galaxy Z Fold 3 Display 

या स्मार्टफोन ला २ स्क्रीन असून यातील मुख्य स्क्रीन ७.६० इंचाचा आहे. तर दुसरा स्क्रीन ६.२० इंच आहे. यातील ७.६० इंच स्क्रीन २२०८ x १७६८ पिक्सेल रीझोलुशनचा असून ६.२० इंच स्क्रीन चा रीझोलुशन ८३२x२२६८ पिक्सेलचा आहे.


Samsung Galaxy Z Fold 3 RAM & Storage 

या स्मार्टफोनचा RAM 12GB असून  Internal storage 256GB आहे. 

Samsung Galaxy Z Fold 3 Camera Specs 

या स्मार्टफोनमध्ये आपल्याला ३ रियर कॅमेरे पाहायला मिळतात. हे तिन्ही 12-megapixel (f/1.8, 1.8-micron) + 12-megapixel (f/2.2, 1.12-micron) + 12-megapixel (f/2.4, 1.0-micron) आहेत. फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचं तर यातील सेल्फि कॅमेरा दोन असून ते  10-megapixel (f/2.2, 1.22-micron) + 4-megapixel (f/1.8, 2.0-micron) चे आहेत.


Samsung Galaxy Z Fold 3 OS

या स्मार्टफोन मध्ये आपल्याला वन UI Android ११ ऑपरेटिंग सिस्टीम मिळते. कनेक्टीवीटी साठी Wi-Fi,GPS, Bluetooth v 5.10, NFC,USB Type-C देण्यात आले आहेत. यामध्ये २ nano सिमकार्ड बसतात जे 5 G, 4 G, 3 G ला सपोर्ट करतात.
तर सेन्सर पाहिल्यास Face unlock, Fingerprint sensor, Compass/ Magnetometer, Proximity sensor, Accelerometer, Ambient light sensor,Gyroscope, Barometer हे सेन्सर देण्यात आले आहेत. 

samsung-galaxy-z-fold-3-price-in-india


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या