तर मंडळी याचे उत्तर सध्या कोणीच देऊ शकत नाही मात्र तुम्हाला 1 किंवा 1 पेक्षा जास्त मार्क पडले असतील तर तुम्ही Maharashtra TAIT 2023 परीक्षा पास आहात हे नक्कीच लक्षात ठेवावे लागेल.
मात्र पवित्र पोर्टलवर भरल्यानंतर आपला अर्ज भरल्यानंतर जितके उमेदवार निवडले जातील ते खरे पास असतील.
Cutoff च्या बाबतीत देखील वरीलच नियम लागू होतो. शिक्षक भरतीसाठी बरेच नियम लागू होतात. यामध्ये तुम्हाला पडलेले गुण, माध्यमिक साठी विषयानुसार निघणारे पोस्ट, वय, कास्ट वाईज निघणाऱ्या जागा असे भरपूर नियम लागू होतात. त्यामुळे आताच कोणीही अंदाज बांधू शकत नाही.
सध्या सोशल मीडियावर एक एक्सल शिट शेअर केली जात असून यामध्ये किती मार्कांचे किती उमेदवार आहेत? हे सांगितलं आहे.
दिलेल्या माहितीनुसार 180 मार्कांचे 2 उमेदवार आहेत तर 170 मार्कांचे 35 उमेदवार आहेत, 160 मार्क पर्यंत मिळवलेले 128 विद्यार्थी आहेत.
150 गुण प्राप्त विद्यार्थी 331 आहेत.
140 गुण प्राप्त विद्यार्थी 779 आहेत. अशी यादी देण्यात आली आहे.
या फोटोची सत्यता जीवन मराठीने पडताळून पाहिली नाही. फक्त आपल्या माहितीसाठी म्हणून शेअर करण्यात आली आहे.
👆👆 शिक्षक होण्यासाठी पवित्र पोर्टलवर आपले नाव भरावे लागणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी आतापासूनच तयार ठेवा वरील लिंकवर यादी देण्यात आली आहे. ती एकदा नक्की वाचा.


