शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2023 साठी देखील बुद्धिमत्ता या विषयांवर साधारणता 80 प्रश्न विचारले जाणार आहेत हे प्रश्न एक मार्कासाठी आहेत. आणि आज पर्यंतच्या आपल्या शालेय सिल्याबस मध्ये बुद्धिमत्ता या विषयावर जास्त काही सहभाग असलेला आढळत नाही.
बुद्धिमापन चाचणीचा स्पर्धा परीक्षांसाठी निश्चित असा अभ्यासक्रम नाहीये मात्र 2017 या वर्षी झालेल्या TAIT परीक्षेवरून आलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये खालील घटक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावरूनच आपण एक निश्चित अभ्यासक्रम ठरवता येतो.
बुद्धिमत्ता विभागाचे प्रथमतः प्रामुख्याने दोन गट पडतात.
1. शाब्दिक बुद्धिमत्ता (verbal intelligence/ Reasoning)
2. अशाब्दिक बुद्धिमत्ता (Non-verbal intelligence/ Reasoning)
शाब्दिक बुद्धिमत्ता
शाब्दिक बुद्धिमत्ता या विभागांमध्ये आपल्याला सामान्य मानसिक क्षमता या विभागावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये खालील घटकांचा समावेश करता येईल.
•मालिका पूर्ण करणे.
•दिलेल्या घटकातील विसंगत घटक शोधणे.
•समान संबंधांची जोडी पूर्ण करणे.
•आकृत्यातील रिकाम्या जागा शोधणे.
•सांकेतिक भाषेत असलेले सांकेतिकरण आणि नि:सांकेतिकरण वरचे प्रश्न
•वेन आकृत्यांचा वापर करत वेगवेगळ्या घटकातील परस्पर संबंध स्पष्ट करणे.
•दिशाज्ञान चाचणी
•त्रिकोण मोजणे/चौकोन मोजणे/चौरस मोजणे/आयत मोजणे
•नातेसंबंध यावर आधारित प्रश्न
•रांगेमधील क्रम आणि मोजणी यावरचे प्रश्न
•दिनदर्शिका घड्याळ वय यावरील प्रश्न
असे प्रश्न सामान्य मानसिक क्षमता या विभागात विचारले जाऊ शकतात.
शाब्दिक बुद्धिमत्तेच्या भागांमध्ये दुसरा प्रकार असतो तो म्हणजे तर्कशास्त्रीय युक्तिवाद. यामध्ये खालील पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात.
•विधान आणि विवाद: एखाद्या विषयासंदर्भात यात दोन मुद्दे मांडले जातात आणि त्या मुद्द्यांचा पुष्ठ्यर्थ दिलेले कारण किती सबळ आहे हे आपण सांगायचे असते असे प्रश्न यात विचारलेले असतात.
•तर्क आणि अनुमान: यामध्ये विधानांमध्ये माहिती दिली जाते. दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आहे असे मानून याची निष्कर्ष काढायचे असतात.
• विधान आणि गृहीतके: या प्रश्नांमध्ये विधान दिलेले असते आणि त्या विधानामागे दडलेल्या गृहीतकांवर प्रश्न विचारले जातात.
शाब्दिक बुद्धिमत्ता या भागामध्ये तिसरा प्रकार असतो तो म्हणजे विश्लेषण क्षमता चाचणी. यावर उमेदवाराच्या विश्लेषण क्षमतेवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
•वर्गीकरण : माहितीचे पृत्थकरण करत त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे.
•बैठक/आसन व्यवस्था: यामध्ये वस्तू किंवा व्यक्तींची ओळीत किंवा वर्तुळाकार रचनेमध्ये गोंधळून टाकणारी बैठक व्यवस्थेबाबत माहिती देण्यात आलेली असते आणि येथे त्यांचा योग्य क्रम लावत आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायचे असतात.
•निर्णय क्षमता: एखाद्या प्रसंगी उमेदवार प्रसंग अवधान राखत कोणता निर्णय घेईल अशावर आधारित येथे प्रश्न विचारलेले असतात.
•तुलना: यावरील प्रश्नांमध्ये वस्तूच्या विशिष्ट गुणधर्मानुसार योग्य क्रम लावून प्रश्नांची उत्तरे द्यायचे असतात.
•घटनाक्रम: यामध्ये दिलेल्या घटना ज्या क्रमाने घडलेले आहेत याची माहिती दिलेली असते ही माहिती ओबडधोबड स्वरूपात असते आणि त्यांचा योग्य क्रम लावत आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायचे असतात.
अशाब्दिक बुद्धिमत्ता:
या भागामध्ये आपल्याला मालिकापूर्ती, समान संबंध, आरशामधील प्रतिमा आणि जल प्रतिबिंब, अपूर्ण आकृती पूर्ण करणे असे बरेच टॉपिक पाहायला मिळतात त्याबद्दल खाली सविस्तर चर्चा करूया.
•मालिकापूर्ती: यामध्ये आकृत्यांची मालिका दिलेली असते आणि त्या मालिकेमधील आकृत्यातील संबंध ओळखा प्रश्नचिन्ह दिलेल्या जागी आकृती पर्याय मधनं निवडायचे असते.
•विसंगत आकृती शोधणे: अशा प्रश्नात काही आकृत्यांचा समूह देण्यात आलेला असतो आणि त्यापैकी एक आकृती सोडून इतर सगळ्या आकृतींमध्ये विशिष्ट समान गुणधर्म आढळतात व अपवाद असणारे आकृती उत्तर असते.
•अपूर्ण आकृती पूर्ण करणे: यामध्ये दिलेल्या प्रश्नात पूर्ण आकृतीचा काही भाग हा दिलेल्या पर्यायांमधून शोधून लिहायचा असतो.
•आरशातील प्रतिमा आणि जल प्रतिबिंब: यामध्ये आलेल्या प्रश्नांमध्ये दिलेली आकृती आरशामध्ये किंवा पाण्यामध्ये त्याचे प्रतिबिंब कसे दिसेल असे प्रश्न विचारले जातात दिलेल्या पर्याय मधून आपल्याला असे प्रतिबिंब निवडायचे असते.
•समान संबंध: यामध्ये प्रश्नात तीन आकृत्या दिलेले असतात. आणि पहिल्या कृती ही दुसऱ्या आकृती सोबत संबंध साधत असते आणि त्याच पद्धतीचा संबंध तिसरी आकृती ही चौथ्या आकृती सोबत साधत असते. पहिल्या आणि दुसऱ्या आकृती निरीक्षण करून संबंध पाहायचा असतो आणि त्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे आकृती दिलेल्या पर्यायांमधून निवडायचे असते.
•घन आणि सोंगट्या: प्रश्नांमध्ये एखाद्या मोठ्या घनाला रंगवून त्याचे लहान घनात तुकडे केलेले असतात आणि सोंगट्याच्या स्थितीवर आधारित येथे प्रश्न विचारण्यात येतात.
•लपलेली आकृती शोधणे - यामध्ये पर्यायात चार आकृत्या दिलेल्या असतात त्यांच्यापैकी एक आकृती ही प्रश्नातल्या आकृतीमध्ये लपलेली असते ती शोधावयाचे असते.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर आपल्याला 80 मार्क्स म्हणजेच 80 प्रश्न देण्यात येणार आहेत आपण असे प्रश्न दैनंदिन जीवनामध्ये प्रसंगानुरूप सोडवत असतो या ठिकाणी आपलं युक्तिवाद भाषा कौशल्य हे उपयोगाला येतात मात्र ज्यावेळी पेपरमध्ये आपल्याला असे प्रश्न येतात त्यावेळी कमी वेळेमध्ये ती क्लुप्ती वापरणे आपल्याला जमत नाही.
आपण सीटीईटी टीईटी किंवा बीएड किंवा डीएड शिकत असताना बऱ्याच वेळेला निरीक्षण तुलनात्मक अभ्यास आकलन विश्लेषण निष्कर्ष असे कौशल्य वापरला असतो आणि त्याच कौशल्यांचा उपयोग करून वरील प्रश्न सोडवायचे असतात.


