समास म्हणजे काय?(Samas in Marathi)
उदाहरण: राजा आणि वाडा हे दोन शब्द एकत्र येत राजवाडा असा जोडशब्द तयार केला आहे.
ज्यावेळी दोन किंवा अनेक शब्दात परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय किंवा शब्द काढून त्याचा एकच जोड शब्द तयार केला जातो तेव्हा त्या शब्दाच्या एकीकरणाला 'समास' असे म्हणतात.
सामासिक शब्द म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन जोडशब्द तयार होतो. वर दिलेला राजवाडा हा शब्द सामासिक शब्द आहे.
विग्रह म्हणजे सामासिक शब्दाची फोड तयार करून दाखवण्याची पद्धत.
उदाहरण: राजवाडा म्हणजेच राजाचा वाडा.
पद म्हणजे सामासिक शब्दात येणारे दोन शब्द यामधील पहिले पद म्हणजे पहिला येणारा शब्द तर दुसरे पद म्हणजे दुसरा येणारा शब्द.
सामासिक शब्दांमध्ये कोणते पद महत्त्वाचे असते यावरून समासाचे प्रकार ठरवले जातात.
समासामध्ये, कधी पहिले पद महत्त्वाचे असते तर कधी दुसरे पद महत्त्वाचे असते तर कधी दोन्ही पदे महत्वाचे असतात तर कधी दोन्ही पदे महत्त्वाची नसतात आणि यावरून समासाचे प्रमुख चार प्रकार होतात.
प्रधान म्हणजे महत्त्वाचे आणि गौण म्हणजे कमी महत्त्वाचे.
समासाचे चार प्रकार
पहिले पद प्रधान असेल तर अव्ययीभाव समास
दुसरे पद प्रधान असेल तर तत्पुरुष समास
दोन्ही पदे प्रधान असतील तर द्वंद्व समास
दोन्ही पदे एक गौण असतील तर बहुव्रीही समास
अव्ययीभाव समास(+,-)
अव्ययीभाव समासमध्ये पहिले पद प्रधान असते सामासिक शब्दाचा उपयोग क्रियाविशेषण अव्यय सारखा केलेला असतो.
उदाहरण: प्रतिदिन, आमरण, क्षणोक्षणी, हररोज, दररोज, बिनशर्त यासारखे शब्द.
तत्पुरुष समास(-,+)
तत्पुरुष समास या समासात दुसरे पद प्रधान असते आणि पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते.
उदाहरण: श्रीखंड, महाराष्ट्र, राजवाडा, विद्यालय, देशप्रत, सुखप्राप्त, रामशरण यासारखे शब्द.
द्वंद्व समास(+,+)
या समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात.
उदाहरण: सुखदुःख, केरकचरा,पाप-पुण्य, न्यायअन्याय, घरदार यासारखे शब्द.
बहुव्रीही समास(-,-)
या समासामध्ये दोन्ही पदे गौण असतात आणि त्यामधून तिसऱ्याच पदाचा बोध होतो.
उदाहरण: दशमुख, गजानन, चंद्रशेखर, पवणसुत, उमापती, लंबोदर.


