वर्तनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे त्यामुळे मानसशास्त्राची अचूक आणि मूर्त व्याख्या करणे कठीण आहे.
प्लूटो: ज्ञान हे अंतर्भूत असते.
जॉन लॉक: प्रत्येक मूल हे कोरी पाटी घेऊन जन्माला येते. अध्ययन आणि अनुभवातून ज्ञान मिळवले जाते.
Psychology हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून तयार झालेला आहे. यामध्ये psyche म्हणजे आत्मा आणि logos म्हणजे शास्त्र किंवा ज्ञानाची शाखा.
यामुळे मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करण्याचा शास्त्र असा याचा अर्थ झाला.
आत्मा पहाता येत नसल्याने आणि ती मूर्त संकल्पना नसल्याने मानसशास्त्रज्ञ वरील व्याख्यामुळे समाधानी नव्हते. आत्मा आणि मन या दोन्ही अमूर्त संकल्पना आहेत. तर्कशास्त्रात प्रयोग माहिती निरीक्षण याच्या साह्याने माहिती सिद्ध करता येते. मात्र मानसशास्त्रात निरीक्षण आणि प्रयोगाचा आधार असला पाहिजे आणि मन आणि आत्मा याचे निरीक्षण करता येत नाही मन आणि आत्मा आपण पाहू शकत नाही किंवा त्याला स्पर्श करू शकत नाही त्यामुळे मन कसा आहे याचे स्वरूप आपण सांगू शकत नाही किंवा ते कोठे आहे हे ही दाखवू शकत नाही म्हणून मानसशास्त्राची व्याख्या बदलण्यात आली आहे.
बोधाअवस्थेचा अभ्यास (विल्हेम वुंट)
जर्मनीमधील मानसशास्त्रज्ञ विल्यम वुंट यांनी 19 व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा लिपझिग (Leipzig) येथे सुरू केले.
पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा 1879 मध्ये सुरू करण्यात आली येथे मानवी वर्तनाचा अभ्यास ते करत असत.
बोधात्मक अनुभव:
व्यक्तीच्या मानसिक घडामोडीची त्याला असलेली जाणीव म्हणजे बोधात्मक अनुभव होय.
विल्यम वून्ट यांनी केलेल्या प्रयोगानंतरच मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून उदय झाला तर व्यक्तीच्या स्मरणात असलेल्या मानसिक प्रतिमा भूत वर्तमान आणि भविष्यकाळात असलेल्या जाणिवांशी निगडित असतात तसेच प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ संवेदन आणि बोधावस्था यावर आधारित असलेले प्रयोग या प्रयोगशाळेत केले आहेत.
Wilhelm Wundt German physiologist information in Marathi
•विल्हेम वुंट यांनी 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा चालू केली त्यामुळे मानसशास्त्र एक पद्धतशीर अभ्यास करणारे स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयाला आले.
• मानसशास्त्राचा बोधात्मक अनुभवाचा अभ्यास म्हणून विल्हेम वुंट यांनी व्याख्या केली आहे.
•मूलभूत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धती विल्यम वुंट यांनी वापरली.
•आत्मनिरीक्षण पद्धती विल्यम वुंट यांनीच विकसित केली आहे.
बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र - विल्हेम वूंट
अबोध वर्तनाचा अभ्यास:
मानसशास्त्राचा अबोधवस्थेच्या दृष्टिकोनातून डॉक्टर सिग्मंड फ्राइड यांनी विचार केला.
आपल्या वर्तनात मागच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते असं फ्राइड यांचं मत होतं.
सिग्मंड फ्राईड यांच्यामध्ये आपल्या मनाची एक अबोध पातळी असून त्यामध्ये आपल्याला धोकादायक ठरू शकणाऱ्या तीव्र इच्छा आणि आकांक्षा दबल्या जातात.
पण फ्राइड यांनी लहान वयात येणाऱ्या अनुभवांवर भर देऊन व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही पहिल्या पाच वर्षात होत असते असं त्यांनी मत व्यक्त केलं.
Sigmund Freud Austrian neurologist information in Marathi
•सिग्मंड फ्राईड हे ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ आणि मनोविश्लेषणाचे संस्थापक आहेत.
•सिग्मंड फ्राइड यांनी मानसशास्त्राची अबुधावस्तीच्या दृष्टीने व्याख्या तयार केली आहे.
•डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांच्या मते बाल्यावस्थेत आलेले अनुभव आणि अबोध प्रेरणा यांचा व्यक्तीच्या वर्तनावर आणि व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असतो.
•सिग्मंड फ्राईड यांच्या मते जर व्यक्तीच्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या मानसिक समस्या दिसून आल्या तर त्याचे मूळ कारण हे त्यांच्या लहानपणी आलेल्या अनुभवामुळे असते.
अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र- डॉ. सिग्मंड फ्रॉइड
वर्तनाचा अभ्यास
मानस शास्त्राची आधुनिक व्याख्या:
"मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास"
वरील व्याख्येप्रमाणे यामध्ये वर्तन, मानसिक प्रक्रिया आणि वैज्ञानिक पद्धती हे घटक महत्त्वाचे आहेत.
वर्तन:
आजूबाजूच्या परिसरात उद्दीपक घटकांना व्यक्तीने दिलेली प्रक्रिया म्हणजे वर्तन होय.
म्हणजे प्रत्येक व्यक्ती एकाच उद्दीपकाला वेगवेगळी प्रतिक्रिया देऊ शकते कारण त्यांच्या अभिरुची, व्यक्तिमत्व आणि अभिवृत्ती यानुसार या प्रतिक्रिया अवलंबून असतात. व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपात असू शकते.
Overt: व्यक्त वर्तन हे प्रत्यक्ष निरीक्षणावर अवलंबून असते.
उदाहरण: बोलणे, नाचणे, चालणे.
Covert: अव्यक्त वर्तन हे निरीक्षण क्षम नसते. उदाहरण: विचार करणे, भावना व्यक्त करणे.
मानसिक प्रक्रिया:,
मानसशास्त्रात आपण वर्तनाच्या अंतर्गत आणि बाह्य घटकांचा विचार करत असतो यामध्ये व्यक्तीच्या मानसिक प्रक्रियेचा आपण विचार करतो.
उदाहरण स्मरणशक्ती, विचार, भावना, विस्मरण, अवधान, प्रेरणा, संवेदन.
वैज्ञानिक पद्धती:
व्यक्तीचे नियंत्रित पद्धतीने केलेले वस्तुनिष्ठ निरीक्षण म्हणजे प्रयोग होय येथे संशोधक प्रयोग करता स्वतःच्या गृहीतकांचे निरीक्षण करत असतो आणि प्राथमिक समूहाकडून मिळालेली माहिती गोळा करत असतो आणि अनुमाने बनवतो. अनुमाने मानवी वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी आणि भविष्यातले वर्तनाचे पूर्व कथन करण्यासाठी वापरण्यात येतात.
वर्तन म्हणजे काय?
वर्तन हे व्यक्ती आणि प्राण्यांनी केलेली कोणतीही गोष्ट ज्याचे निरीक्षण करता येते नोंद करता येते आणि अभ्यास करता येते- जॉन वॉटसन
जॉन वाटसन यांनी उद्दीपक-जीव-प्रतिक्रिया प्रारूप मांडले आहे.
यामध्ये एस-ओ-आर म्हणजेच S हा उद्दीपकाचे प्रतिनिधित्व करतो O हा जीवाचे प्रतिनिधित्व करतो व R हे प्रतिक्रियांचे प्रतिनिधित्व करते.
S-O-R
उद्दिपक - जीव - प्रतिक्रिया
उदाहरण:
उद्दीपक - शिक्षक शाळेत प्रश्न विचारतात.
जीव - वर्गातील विद्यार्थी
प्रतिक्रिया - विद्यार्थी उत्तरे देतात


