(Get Smartphone in under 7000 )
◾ItelA 48
कमी किमतीत चांगल्या बॅटरी बॅकअप सह अनेक फीचर्सने परिपूर्ण असा एक जबरदस्त स्मार्टफोन म्हणून या फोनचा यादीत पहिला क्रमांक दिला आहे. Itel A48 असे स्मार्टफोनचे नाव असून तुम्ही तो ऑनलाइन देखील खरेदी करू शकता. Itel A48 ची किंमत ६,५९७ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.१ -इंचाची HD+ स्क्रीन आहे. . त्याच सोबत या स्मर्टफोनमध्ये क्वाड कोर प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये आहे. आणि ३००० mAh बॅटरी प्रोव्हाइड करण्यात आली आहे. ५ MP रियर आणि फ्रंट कॅमेरा सह हा स्मार्टफोन युजर्सना मिळेल.
◾Nokia C01 Plus
Nokia C01 Plus हा ग्राहकांसाठी सर्वात मस्त स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पर्याय ठरू शकतो. २ GB रॅम आणि १६ GB इंटरनल स्टोरेज सह स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे .देण्यात आले आहे. शिवाय या स्मार्टफोनमध्ये ५ MP रियर कॅमेरा आणि २ MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय ग्राहकांना या स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंच स्क्रीन, Unisoc SC9863A प्रोसेसर प्रोव्हाइड करण्यात आले आहे. यात ३००० mAh ची बॅटरी बॅकअप मिळेल.Nokia C01 Plus स्मार्टफोनची किंमत ६,१९९ रुपये आहे.
◾Infinix Smart 5A
ज्या ग्राहकांना कमी बजेटमध्ये जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल त्यांनी या स्मार्टफोनचा नक्की विचार करावा कारण Infinix Smart 5A मध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलिओ A 20 प्रोसेसर देण्यात आले आहे. Infinix Smart 5A फोन २ GB रॅम + ३२ GB इंटरनल स्टोरेज युजर्सना प्रोव्हाइड करण्यात येतो. या स्मार्टफोनची किंमत ६,९९९ रुपये आहे. फोटग्राफीसाठी या मध्ये हॅलो ८ मेगापिक्सेल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनची ची बॅटरी ५००० mAh आहे. या स्मार्टफोन तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता.Infinix Smart 5A हा स्मार्टफोन Android 11 (Go Edition) सह येतो.
◾JioPhone Next
JioPhone Next ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण कमी बजेटमध्ये जबरदस्त स्मार्टफोन Reliance Jio ने लॉन्च केला आहे.JioPhone Next हा नवीन स्मार्टफोन ग्राहकांना अनेक फीचर्स भेटीस आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ५. ४५ इंच टचस्क्रीन HD डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे. याचे रिझोल्यूशन ७२० x १४४० पिक्सेल आहे. या स्मार्टफोनमध्ये १३ MP कॅमेरा आणि ८ MP सेल्फी कॅमेरा मिळेल. यासोबतच डिवाइसमध्ये स्नॅपड्रॅगन QM-215 प्रोसेसर आणि ३, ५०० mAh बॅटरी बॅकअप आहे.
या स्मार्टफोनची किंमत ६,४९९ रुपये आहे.


