झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेवर प्रेक्षक भरपूर प्रेम करत आहे. कालच या मालिकेत नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये गरबा आणि दांडिया चा स्पेशल भाग दाखवण्यात आला होता. पण पडद्यामागची कहाणी वेगळीच आहे. हा भाग चित्रीकरण करण्यासाठी ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत म्हणजेच दिपू आणि इंद्रा त्याचप्रमाणे इतर कलाकारांना तब्बल ३५ तास अथक प्रयत्न करावे लागले. आणि म्हणूनच आपल्याला हा भाग पाहता आला.
सध्या या मालिकाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलाच ताबा मिळवला आहे. इंद्रा आणि दिपू ची सुपरहिट जोडी खूपच गाजते आहे. काल झालेला नवरात्र उत्सवाच्या सण ऋता दुर्गुळे ने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
ऋताने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ पोस्ट केला जो मालिकेच्या नवरात्री स्पेशल भागाच्या चित्रीकरण दरम्यानचा आहे.
त्या व्हिडिओमध्ये मालिकेतील या भागाच्या चित्रीकरणासाठी किती प्रयत्न केले हे स्पष्टपणे दिसत आहे. ऋता ने सांगितले कि," हा भाग चित्रीकरणासाठी आम्हाला 35 तास सलग काम करावे लागले.काहीतरी सुंदर तयार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन मेहनत करणे गरजेचे आहे. मी लेखकांचे आभार मानते .ज्यांनी हे उत्कृष्ट सिन लिहला आहे. याच सोबत कॅमेरामॅन ,दिग्दर्शकांच्या मेहनतीला. तिथे मेकअप रूम ची व्यवस्था नव्हती तरीसुद्धा सगळं मॅनेज करता आलं.आणि हे सर्व अति उत्साही लोक पाहून सगळा थकवा विसरून गेला. आम्हाला सगळं साहित्य पुरवणाऱ्या निर्मात्यांच्या टीमला सुद्धा धन्यवाद."


