अलीकड शेअर बाजार लईच वर गेलेला हाय. या शेअर मार्केटन विक्रमी टप्प्यास गवसणी घातल्याच आपल्याला कळलंच असलं. पर यामुळं लय मुदतीसाठी गुंतवणूक करणारी लोक लई श्रीमंत झाल्यात. येत्या काही महिन्यात मुबंईचा शेअरबाजार निर्देशांक असलेला सेन्सेक्स 1 लाखाहून वर जाईल असं भाकीत वर्तवल जात असून आताच गुंतवणूक केल्यावर आपल्याला चांगला फायदा मिळवण्याची संधी हाय.
आता शेअर मार्केटमधल्या गीता रिन्यूएबल एनर्जी (Gita Renewable Energy) यांच्या शेअरची चर्चा ऐकलीय का? नाही. चला तर मग जाणून घेयुया. मागल्या वरीसभरात Gita Renewable Energy कंपनीच्या शेअरन गुंतवणूक केलेल्यांना 4130 टक्क्यांन रिटर्न्स दिल्याचं माहिती मिळतंय. मागल्या वर्षात 13 ऑक्टोबरला 2020 ला या शेअरची किंमत फकस्त 5.52 रुपये एवढीच होती. पण 14 ऑक्टोबर 2021 ला या शेअरची प्राईज 233.50 रुपये नोंदवण्यात आलीय. म्हंजी तुम्ही जर सहा महिन्यांपूर्वी Gita Renewable Energy च 1 लाख रुपयांच शेअर्स विकत घेतलं असत तर आज त्याच मूल्य सुमारे 7.95 लाख रुपय इतक झाल असत. हाय की नाय इंटरेस्टिंग?
मधल्या काळात या शेअरची किंमत 300 रुपयांवर गेलती. पण, सप्टेंबर महिन्यामधी या शेअरची किंमत 120 रुपयांपतूर खाली आलती. गीता रिन्यूएबल एनर्जी ही कंपनी उर्जा क्षेत्रामधली कंपनी असून येत्या काळामधी या कंपनीची वाटचाल चांगली होईल, अस मत जाणकारांच असल्याचं कळतंय.
यात गुंतवणूक करायचं का?
मागच्या महिनाभरामधी Gita Renewable Energy च्या शेअरची किंमत जवळपास निम्म्याने कमी झाली असून ही किंमत लय झपाट्याने घसरत असल्यान अनेकदा या समभागाला लोवर सर्किट लागलं. मात्र त्यामुळं मागच्या महिनाभरामधी या कंपनीच शेअर खरेदी केलेल्या गुंतवणुक केलेल्या मोठा फटका बसलाय. आता शेअरची किंमत आजपातूरच्या उच्चांकापेक्षा लईच खाली हाय तरीपण यात गुंतवणूक करताना काळजी घेणं गरजेच हाय.
गीता रिन्यूबल एनर्जी च्या शेअरची 1 वर्षातल्या लो हाय बद्दल बोलायच तर या कंपनीच लो ₹5.52 असून हाय ₹300 ला पोहचल्याच फोटोत दिसतंय.
जाहिरात : स्टॉक आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 10 दशलक्ष भारतीयांसह आताच सामील व्हा.


