Amazon

Ads Area

header ads
header ads

Sun Marathi नवीन चॅनेल लॉन्च होणार 'या' दिवशी, पहा मालिकांच्या वेळा

Sun Marathi (सन मराठी) ही मराठी भाषेतील नवी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस येत असून 17 ऑक्टोबर पासून या चॅनेलची सेवा सुरू होणार आहे. ही वाहिनी जनरल इंटरटेन्मेंट चॅनेल कॅटेगरीतील असून या चॅनेलवर आपल्याला नव्या मालिकांचा आस्वाद घेता येणार आहे. 

SUN MARATHI वाहिनी DD FREE DISH वर उपलब्ध असून तो चॅनेल नंबर 91 वर पाहता येईल. हा चॅनेल आपण डीडी फ्री डिशवर मोफत पाहू शकणार आहोत. 

Sun Marathi Program Schedule/Timetable

Sun Marathi या चॅनेलवर सध्या सहा मराठी मालिका दाखवण्यात येणार असून रोज सायंकाळी 6.30 वाजल्यापासून आपल्याला या मराठी मालिकांचा आस्वाद घेता येणार आहे. 

सन मराठी चॅनेलवर सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी आपल्याला 'नंदिनी'(Nandini Marathi Serial) पाहायला मिळणार आहे. 'सुंदरी'(Sundari Marathi Malika Update) हा मराठी प्रोग्राम आपल्याला सन मराठी चॅनेलवर ठीक 7 वाजता पाहायला मिळेल.

बरोबर 7 वाजून 30 मिनिटांनी आपल्याला 'जाऊ नको दूर बाबा' या मराठी मालिकेचा आस्वाद घेता येणार असून या मराठी सिरीयल मध्ये वडील आणि मुलगी यांचं नात या स्टोरीवर ही मालिका दाखवण्यात येणार आहे.

'आभाळाची माया' ही मालिका आपल्याला ठीक 8 वाजता पाहायला मिळेल. ही मराठी मालिका बहीण भावाच्या नात्यावर भाष्य करते. त्यांनतर आपल्याला सन मराठीवर 'कन्यादान' मालिका पाहायला मिळेल. ही मालिका आपल्याला 8 वाजून 30 मिनिटांनी पाहायला मिळेल. त्यानंतर 9 वाजता 'संत गजानन शेगावीचे'ही मालिका पाहायला मिळेल. ही मालिका शेगावच्या गजानन महाराजांवर आधारित आहे.

सन मराठी या नव्या मराठी वाहिणीबद्दल नवे अपडेट्स येथे शेअर केले जातील. त्यामुळे जीवन मराठीच्या सोशल मीडिया हँडल फॉलो करा.

सन मराठी चॅनेल डीडी फ्री डिश सेटअप बॉक्समध्ये नसेल तर मॅन्युअली ऍड करू शकता. त्यासाठी आपल्याला ऍड न्यु प्रोग्रॅम या बटनावर क्लिक करावे लागेल.येथे गेल्यावर LNB frequency 09750 टाका ट्रान्स फ्रेक्वेन्सी 11550 टाका, सिम्बॉल रेट 29500, पोलरीटी-V, 22K ऑफ, DiSEqC- ऑफ, मोड- फ्री असे ठेऊन ओके बटन दाबावे. नवीन चॅनेल ऍड होईल.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या