भारताचे तीनही दल हे खूप महत्त्वाचे कामगिरी बजावतात. अनेक विद्यार्थ्यांचे या दलामध्ये भरती होण्याचे स्वप्न असते. तुम्ही सुद्धा आता एका चांगल्या दलात काम करू शकता. चला तर पाहूया काय आहे ही संधी.
दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय नौदलात (Indian Navy ) काम करण्याची संधी आहे.
नौदलाने एप्रिल २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या बॅच साठी नाविक म्हणून मॅट्रिक भरती (MR) ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये 300 जागा राखून ठेवल्या आहेत. २ नोव्हेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे.
नेव्ही एम आर एप्रिल २०२२ च्या जाहिरातीनुसार जवळपास ३०० रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
💫 आहेत या अटी...
या रिक्त पदासाठी निवड प्रक्रिया चा भाग म्हणून साधारण १५०० विद्यार्थ्यांना लेखी चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी बोलवले जाईल. तसेच लेखी परीक्षेला बसण्यासाठी कट ऑफ निर्धारित केली जाऊ शकते. ही कट-ऑफ प्रत्येक राज्यात वेगवेगळी असू शकते.
पहा अर्ज प्रक्रिया...
◾भारतीय नौदलात मॅट्रिक भरती २०२२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नौदल भरती पोर्टल joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.
◾ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर पासून ते 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
◾अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून नेव्ही एम आर भरती 2021 नोटिफिकेशन डाऊनलोड करून ते काळजीपूर्वक वाचावे.
🔺भरतीसाठी ही आहे पात्रता...
१.जाहीर केलेल्या बॅच साठी एम आर नोटिफिकेशन 2021 नुसार अर्ज करण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक दहावीची परीक्षा उत्तर केलेली असावी.
२.उमेदवारांचा जन्म एक एप्रिल 2002 पूर्वीचा नसावा आणि 31 मार्च 2005 नंतरचा असावा.
३.एम आर च्या एकूण 300 रिक्त पदा साठी अर्ज ज्याच्या आधारे पंधराशे उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.
४.परीक्षेमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील.
५.विद्यार्थी नौसेना भरती पोर्टल वरून अभ्यासक्रम डाऊनलोड करू शकता.
६.जाहीर केलेल्या परीक्षेमध्ये गणित विज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयातून प्रश्न विचारले जातील.


