Amazon

Ads Area

header ads
header ads

नागराज मंजुळे यांच्या घर, बंदूक, बिर्याणी मध्ये सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्या भूमिका

फँड्री, सैराट सारखे हिट सिनेमे देणाऱ्या दिग्दर्शक, निर्माता नागराज पोपटराव मंजुळे यांचा आणखी एक नवा सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येत आहे. सदर चित्रपटाचे नाव घर बंदूक बिर्याणी असून आज या चित्रपटाचा टीजर आटपाट प्रोडक्शनच्या युट्युबचॅनेलवर अपलोड करण्यात आला. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
Ghar Banduk Biryani Photos
GHAR, BANDUK, BIRYANI STARCAST

मिळालेल्या माहितीनुसार घर बंदूक बिर्यानी मराठी  चित्रपटात प्रमुख भूमिका सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि सैराट चित्रपटात परश्याची भूमिका केलेल्या आकाश ठोसरची आहे. 

नागराज मंजुळे नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या विषय योग्य मांडणीत  पडद्यावर आणण्यात पटाईत आहेत. फँड्री चित्रपट हा भारतीय नव्हे तर जगातील लोकांचं लक्ष वेधून घेतला. त्यानंतर आलेल्या सैराटन तर कमाल केली. पूर्वी चित्रपट पाहण्यास होणारी गर्दी मध्यंतरी कमी झाली होती मात्र नागराज यांच्या सैराटन अक्षरशः ती गर्दी खेचून आणली.

 मधील काळात नागराज मंजुळे यांनी काही शॉर्ट फिल्म्स आणि नाळ चित्रपटात काम केले. आता तो 'झुंड' या सिनेमातून  महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. त्यात आता या 'ghar banduk biryani' चित्रपटाच्या टीजरमुळे पुन्हा चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. हा टीजर सोशल मीडियावर रिलीज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 

'घर बंदूक बिर्याणी' च्या टीजरमध्ये सांगण्यात आलं आहे की, झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे प्रस्तुत 'घर,बंदूक,बिर्याणी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

हा चित्रपट झी स्टुडिओज, नागराज मंजुळे आणि भूषण मंजुळे यांनी प्रोड्युस केला असून या चित्रपटातील, डायलॉग्स आणि स्क्रीनप्ले स्वतः नागराज मंजुळे यांनी साकारले आहे. या चित्रपटाचे संगीत AV प्रफुल्लचंद्र यांनी दिल आहे. 

Ghar, Banduk, Biryani movie launch Date 

 टीजर मध्ये दाखवल्या प्रमाणे हा चित्रपट 2022 मध्ये येणार आहे. मात्र अजून तारीख स्पष्ट करण्यात आली नाहीय.

अश्याच ताज्या अपडेट्ससाठी जीवन मराठीला सोशल मीडियावर फॉलो करा.

घर बंदूक बिर्याणी मराठी चित्रपट टीजर
 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या