Amazon

Ads Area

header ads
header ads

अहो आश्चर्य ! भारतातील 'हे 'संपूर्ण शहर फक्त सौरऊर्जेवर चालवले जाते.Solar energy

 सध्याच्या काळात प्रदूषण हे जगाला लागलेलं रोगच असावं. हवामान बदल ,प्रदूषण, पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत यांचा अभाव, इंधन अभाव हे जगासमोर ठेवलेले प्रश्न आहेत.या सर्वांमुळे जगाला गंभीर आजारांना बळी पडावे लागत आहे.

भारतासह जगभरात जीवाश्म इंधनाचा वापर संपवण्यासाठी द भाव वाढत आहे. भारतातील औष्णिक विद्युत केंद्रा मधील वीस वर्षापासून निर्माण होत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पर्यायी ऊर्जा निर्मितीत महत्त्वाचा स्त्रोत ठरला आहे तो म्हणजे सौर उर्जा.


नैसर्गिक आणि सोयीस्कर असा सौर ऊर्जा आपल्या देशातही पर्यायी वीज निर्मितीसाठी महत्त्वाचा ठरतो आहे. देशभरात अनेक ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभे केले जात आहे.


आपल्या भारतातील एका संपूर्ण शहराला या प्रकल्पात उत्तम यश मिळाला आहे. दीव हे संपूर्ण शहर सौर ऊर्जेवर अवलंबून आहे.

तांत्रिक दृष्ट्या नव्हे तर ते एक केंद्रशासित प्रदेश आहे. जे गेल्या काही वर्षांपासून दररोज 100% सौर उर्जेवर चालत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून या शहराला सौरऊर्जेपासून अनेक प्रकल्प करण्यात भरगोस यश मिळाल्यामुळे संपूर्ण शहराला सौर ऊर्जा पुरवली जात असते. सुमारे 112 सहकारी संस्थांच्या छताखाली आणि दोन सौर उद्याने या प्रकल्पाचा आराखडा मांडला गेला आहे. दिवसातील ऊर्जेची गरज ही सौरऊर्जा सहजपणे भागवते.

गुजरातच्या दक्षिणेकडे असलेला दीव हा केंद्रशासित प्रदेश दमण आणि दीव अंतर्गत येऊन हे वेगवेगळे प्रदेश आहेत. दीव चे प्रशासन थेट भारत सरकारच्या ताब्यात येते.


सर्व घरे , हॉस्पिटल एअर कंडिशन असलेली सर्व सरकारी बँका, कार्यालये, आईस्क्रीम कारखाने, फिश वेअर हाऊस हे दीव मधील सौर उर्जेवर चालणारे प्रशंसक प्रकल्प आहे. 42 चौरस किलोमीटरच्या शहरात सुमारे 7 मेगावॅटची गरज पुरवली जाते.

दीव मध्ये ऊर्जा विभागाने सौर ऊर्जा पार्क तयार केली आहेत.

हे सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आले तेव्हा त्याची क्षमता त्या वेळेच्या मागणीच्या दुप्पट होती त्यामुळे आताची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी हे प्रकल्प अगदी सक्षमपणे उभे आहे.


आज देशभरात कोळशाचा अपुरा पुरवठा आणि वीज निर्मिती वर होणारे बंधनकारक निर्णय सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे, पण अशावेळी दीव चे उदाहरण वीज पुरवठा क्षेत्रात क्रांतिकारी ठरली आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या