Amazon

Ads Area

header ads
header ads

वीजनिर्मिती केंद्रांतील कोळसा टंचाईमुळे १३ संच बंद

कोळसा टंचाईमुळे महावितरणची त्रेधातिरपीट उडाली आहे. वेगवेगळ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये तेरा संच बंद पडल्याने महाराष्ट्र राज्याला होणाऱ्या वीज पुरवठा यापैकी तब्बल 3 हजार 330 मेगावॅट वीज पुरवठा थांबला आहे. 
यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अल्प वेळेसाठी लघु  भारनियमन सुरू झाले आहे, तर दीर्घ काळासाठी चे भारनियमन होऊ नये यासाठी प्रयत्न चालू आहे.
सुमारे 2 हजार 500 मेगावॅटची खरेदी

तर सुत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, बाजारामधून सुमारे 2 हजार पाचशे मेगावॅट विजेची खरेदी सुरू असून या सणासुदीच्या दिवसांमध्ये भारनियमन होणार नसल्याचे सांगितले आहे. तर जलविद्युत आणि अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे हे प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती मिळत आहे.

वाचा:

कोळशाच्या खाणीत परिसरांमध्ये सुरू असलेली अतिवृष्टी काही काळ थांबल्यामुळे कोळसा उत्खनन पुन्हा सुरू होण्याची राज्य सरकारला अपेक्षा आहे आणि असे जर झाले तर हे विजेचे संकट टळणार आहे. देशभरामध्ये कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीज निर्मिती कमी प्रमाणात होत आहे.

वाचा:

असाच महत्त्वाच्या अपडेट साठी जीवन मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या