Amazon

Ads Area

header ads
header ads

चेन्नईने सुपर किंग्ज फायनलमध्ये! 4 विकेट्स राखत मॅच जिंकली | DC vs CSK

CSKvsDC IPL 2021 चा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्ज ( CSKvsDC ) आणि दिल्ली कॅपिटल्स ( DCvs CSK) यांच्यात  Dubai International Stadium येथे होता. चेन्नई सुपर किंग्ज आजच्या क्वॉलिफायर मॅचमध्ये 4 गडी राखून विजयी झाली.

DCvsCSK Photos
आजच्या सामन्यामध्ये चेन्नईचा कप्तान MS Dhoniने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या मॅचमध्ये 20 षटकाअखेर दिल्लीची धावसंख्या ५ बाद 172 होती. 

कोण किती धावा केल्या?

दिल्लीकडून पृथ्वी शॉने 34 चेंडूमध्ये 60 धावा केल्या. तर रिषभ पंत ने 35 चेंडूत 51 (नॉट आऊट) धावा केल्या. शिमरॉन हेटमायरने 24 चेंडूत 37 धावा केल्या.

जाहिरात:


दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज कडून जोरदार पारी खेळत ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 70 धावा केल्या. तर रॉबिन उतप्पाने सुद्धा दमदार खेळी केली त्याने 44 चेंडूत 63 धावा केल्या. मॅच अखेरीस आलेल्या धोनीने 6 चेंडूत 18 धावा केल्या. 

कोण किती धावा देत विकेट घेतल्या?

बॉलिंग बाबतीत बोलायचं तर चेन्नईकडून टॉम कुरनने 3.4 ओव्हरमध्ये 29 धावा दिल्या तर 3 विकेट्स घेतले.एनरीच नोर्टजे 31 धावा देत 1 विकेट घेतली. त्याने 4 ओव्हर डिलिव्हर केल्या. तर अवेश खानने 47 धावा देत 1 विकेट घेतली. त्याने सुद्धा 4 ओव्हर डिलिव्हर केल्या आहेत.

वाचा:

दुसरीकडे जॉश हेझलवूडने 2 विकेट घेत 29 धावा दिल्या आहेत. तर त्याने 4 ओव्हर डिलिव्हर केल्या आहेत. रवींद्र जडेजा ने 3 ओव्हर टाकत 1 विकेट घेत 23 धावा दिल्या आहेत. तर मोईन अलीने 4 ओव्हर टाकत 1 विकेट घेतली असून 27 धावा दिल्या आहेत.

जाहिरात:

ऋतुराज गायकवाडने 5 फोर आणि 2 सिक्स मारले आहेत. तर रॉबिन उतप्पाने 7 फोर आणि 2 सिक्स मारल्या. तर MS धोनीने 3 फोर आणि 1 सिक्स मारले आहे.
तर प्रथम फलंदाजी करत असताना पृथ्वी शॉने आपला जलवा दाखवत 7 फोर आणि 3 सिक्स मारले आहेत. रिषभ पंतने 3 फोर आणि 2 सिक्स तर एस. हेटमायरने 3 फोर आणि 1 सिक्स मारले आहेत.

अश्याच महत्वाच्या क्रिकेट अपडेट्स साठी जीवन मराठीला फॉलो करा. 

ही पोस्ट नक्की शेअर करा.👇
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या