Realme GT Neo 2 फीचर्सबद्दल बोलायचं तर यात आपल्याला 120Hz AMOLED डिस्प्ले मिळतो. या स्मार्टफोनच्या रियर साईडला ट्रिपल रियर कॅमेरा आहेत. यातील मुख्य कॅमेरा 64मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
मुख्य म्हणजे हा स्मार्टफोन 5G connectivity सोबत येतो. अलीकडे भारतीय टेलिकॉम ऑपरेटर्स कडून भारतात पुढील पिढीतील सेल्लूलर नेटवर्क आणले गेले आहे. आमच्या कार्याला सपोर्ट करण्यासाठी जीवन मराठी युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.
इतर फीचर्सबद्दल सांगू इच्छितो की, Realme GT Neo 2 स्मार्टफोनमध्ये आपल्याला स्टेरिओ स्पीकर्स मिळत असून ते Dolby Atmos सपोर्ट करतात. आणखी एक हायलाईट करण्याची बाब म्हणजे या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. ऑनलाईन माध्यमात मिळालेल्या माहितीनुसार Realme GT Neo 2 हा Samsung Galaxy M52, Mi 11X 5G, and Poco F3 GT या सारख्या स्मार्टफोनपेक्षा पूर्ण विरुद्ध आहे.
Realme GT Neo 2 price in India, availability
Realme GT Neo 2 ची भारतातील किंमत ₹31,999 देण्यात आली असून ही किंमत 8GB + 128GB storage व्हेरिएंटसाठी आहे. Realme GT Neo 2 हा फोन 12GB + 256GB storage व्हेरिएंटमध्ये सुद्धा उपलब्ध असून याची किंमत ₹35,999 आहे. स्मार्टफोनच्या रंगाबद्दल बोलायचं तर हा स्मार्टफोन 3 विविध रंगात उपलब्ध करून देण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे. Neo Black, Neo Blue, and Neo Green हे तीन कलर व्हेरिएंट आहेत.
या स्मार्टफोनच्या availability बद्दल सांगू इच्छितो की, Realme GT Neo 2 हा स्मार्टफोन 17 ऑक्टोबर पासून 12am (midnight) वाजल्यापासून Flipkart आणि Realme.com वर सेल चालू होणार आहे. आणि भारतातील काही प्रमुख रिटेल स्टोअर्सवर देखील हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे.
Realme GT Neo 2 विकत घेत असताना आपल्याला काही लॉन्च ऑफर्स मिळणार आहेत. फेस्टिव्ह सिजन देल मध्ये 7 हजार पर्यंत आपल्याला हा स्मार्टफोन घेत असताना डिसकाउंट मिळणार आहे. मुख्य बाब म्हणजे Flipkart Plus मेम्बरना हा फोन 1 दिवस अगोदर खरेदी करता येणार आहे. तो October 16 पासून 12 am पासून उपलब्ध असणार आहे.
Realme GT Neo 2 specifications
Realme GT Neo 2 हा स्मार्टफोनमध्ये Android 11 ऑपरेटिंग सिस्टीम असून हा Realme UI 2.0 आधारित फोन आहे.
डिस्प्ले बद्दल बोलायचं तर 6.62-इंच full-HD+ Samsung E4 डिस्प्ले देण्यात आलं असून 120Hz refresh rate आहे. हा display 600Hz touch sampling rate सुद्धा देतो आणि HDR10+ सपोर्ट देखील आहे.
Realme GT Neo 2 च्या प्रोसेसर बद्दल सांगू इच्छितो की यात Qualcomm Snapdragon 870 SoC प्रोसेसर असून 12GB RAM या स्मार्टफोनमध्ये मिळतो. सोबत हा स्मार्टफोन 7GB of virtual memory (Dynamic RAM Expansion) चा सुद्धा सपोर्ट असून याचा उपयोग मल्टीटास्किंग साठी होतो.
ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.


