Amazon

Ads Area

header ads
header ads

IPL 2021 KKR vs CSK won : चेन्नई फायनल जिंकली, चाहत्यांचा आनंद गगनात मावेना, चौथ्यांदा जेतेपद मिळवलं

IPL 2021च्या आज झालेल्या सामन्यात महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवत चौथ्यांदा IPL ची ट्रॉपी जिंकली. KKR म्हणजे कोलकात्याच्या संघाने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतल्यावर चेन्नई संघाने 192 धावा 20 ओव्हरमध्ये केल्या. आणि KKR या IPL मधील संघाला 193 धावांच लक्ष्य दिल मात्र KKR संघास ही धावसंख्या काढताना नाकीनऊ आले आणि या सामन्यात CSK संघाने 27 धावानी विजय मिळवला. कोलकात्याच्या संघ 165 रन्स काढत गारद झाला. KKR संघाची प्रथम सुरवात चागली झाली मात्र नन्तर संघ कोसळू लागला एकामागून एक फलंदाज तंबूत परतले. आजपर्यत आई पी एल मध्ये मुंबईनंतर सर्वाधिक जेतेपद राखणारा CSK हा संघ ठरला. 

या मॅचमधून चेन्नई संघाने 9 वर्षपूर्वीचा बदला घेत IPL 2021 ट्रॉफी नावावर केली. या मॅच मध्ये शुभमन गिल याने 51 धावा केल्या त्यासाठी त्याला 43 बॉल लागले. तर 3 सिक्स आणि 5 फोर द्वारे व्यंकटेश अय्यर याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर तो तंबूत परतला. नितीश राणा खातही न उघडता तो तंबूत परतला. सुनिल नरेन याने 2 धावा केल्या. मॉर्गन 4, दिनेश कार्तिक 9 अश्या धावा करत तंबूत परतले.तर शाकीब उल हसन डक आऊट होत तंबूत परतला.
  
दरम्यान, ऋतुराज गायकवाड याने 27 चेंडूत 32 धावा घेतल्या. यात त्याने 1 सिक्स आणि 3 फोर मारले. दुप्लेसी चांगली खेळी करत 86 धावा केल्या यासाठी त्याने 59 चेंडू वापरले. रॉबिन उतप्पा ने 31 धावा केल्या. मोईन अली याने 3 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीनं 20 चेंडूत 37 धावा केल्या. 

याआधी 2010, 2011 आणि 2018 मध्ये चेन्नईने ट्रॉपी जिंकली असून त्यावेळी सुद्धा धोनीच नेतृत्व करत होता. यंदा चौथ्या वेळेस ही ट्रॉपी जिंकण्यात यश आलं.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या